माझ्या वडिलांच्या मृत्यूच जेवढं दुखः तेवढचं आता होतयं - राहूल, प्रियंका गांधीकडून पीडितांचं सांत्वन
"माझ्या वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा मला जेवढं दुखः झालं तेवढचं दुखः मला आता होत आहे, वायनाडमधील लोकांनी केवळ एक वडील नाही तर संपूर्ण कुटुंब गमावलं आहे अशा शब्दात राहूल गांधी यांनी केरळातील वायनाड इथल्या भुसख्खलसंदर्भात भाष्य केलं.
संसदेतील विरोधी पक्षनेते तथा काॅंग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आज केरळमधील वायनाडमध्ये झालेल्या भीषण भुसख्खलनात प्रभावित झालेल्या लोकांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

ही देशाची भयंकर शोकांतिका
"केरळमधील वायनाड इथलं भुसख्खलन व त्यानंतरची तिथली स्थिती ही देशासाठी एक भयंकर शोकांतिका आहे. इथं अनेक लोकांनी आपल्या कुटुंबातील सदस्य गमावले असून हे अत्यंत वेदनादायी असल्याचं राहूल गांधी यांनी म्हटलं आहे.आम्ही सर्वजण या लोकांचा आदर करतो. आणि संपूर्ण देशाचे लक्ष वायनाडकडे आहे असंही ते म्हणाले.
आपत्तीग्रस्तांच पुनर्वसन आवश्यक
राहुल गांधी म्हणाले,, "वायनाडची स्थिती ही देशासाठी एक भयंकर शोकांतिका आहे. आम्ही येथे परिस्थिती पाहण्यासाठी आलो आहोत. किती लोकांनी कुटुंबातील सदस्य गमावले हे सांगणेही वेदनादायक आहे. या सर्वांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करु तसंच त्यांचं स्थलांतरही आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं.
'..ही राष्ट्रीय आपत्ती बघू सरकार काय म्हणतं'
राहुल गांधी म्हणाले, "माझ्या मते, ही राष्ट्रीय आपत्ती आहे. सरकार काय म्हणते ते पाहूया. ही राजकीय मुद्द्यांवर बोलण्याची ही वेळ नाही. येथील लोकांना मदतीची गरज आहे, सर्व मदत मिळेल याची खात्री करावी लागणार आहे.
लोकांना खूप वेदना होत आहेत
वायनाड भूस्खलनात वाचलेल्यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा म्हणाल्या, "आम्ही संपूर्ण दिवस पीडित लोकांना भेटत आहोत. ही एक मोठी शोकांतिका आहे, लोकांना किती वेदना होत आहेत याची आम्ही फक्त कल्पना करू शकतो. हिमाचल प्रदेशातही एक मोठी शोकांतिका घडली आहे, आम्ही विशेषत: आता स्वतःहून राहिलेल्या मुलांना कशी मदत करू शकतो याचा विचार करू."
राहूल, प्रियंकाकडून संवेदना व्यक्त
दरम्यान मृतांच्या कुटुंबाची राहूल, प्रियंका गांधी यांनी भेट घेतली. त्यांनी मृतांप्रती दुखः व्यक्त करुन पीडितांच्या पुनर्वसनासाठी सर्व सहाय्य करण्याचं त्यांनी आश्वासनही दिलं. आज दोन्ही नेत्यांनी चोरलामाला भूस्खलनाच्या ठिकाणी पोहोचले, त्यांनी पीडितांशीही संवाद साधला. तसेच त्यांच्याप्रती संवेदनाही व्यक्त केल्या.
#WATCH | Kerala | NDRF personnel are engaged in a rescue operation in Wayanad which was struck by landslides triggered by heavy rains
— ANI (@ANI) August 1, 2024
The death toll stands at 167.
(Source: NDRF) pic.twitter.com/5ZXq5BUtoT
दरम्यान, राहूल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा हे जखमींची भेट घेण्यासाठी वायनाड रुग्णालयात गेले. तिथे त्यांननी जखमींची विचारपूसही केली.












Click it and Unblock the Notifications