मोठी बातमी : मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू, मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी दिला होता राजीनामा
मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू, हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी तीन दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. त्यानंतर आज राष्ट्रपती राजवट लावण्यात आली आहे.
केंद्र सरकारने गुरुवारी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. 9 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राज्यपालांकडे राजीनामा सादर केला.

21 महिन्यांपासून सुरू आहे जातीय हिंसाचार
राज्यात 21 महिन्यांपासून सुरू असलेल्या जातीय हिंसाचारामुळे बिरेन सिंग यांच्यावर राजीनामा देण्यासाठी प्रचंड दबाव होता. विरोधी पक्षही या मुद्द्यावर एनडीएवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते.

नेमकं कधी काय घडलं, वाचा संपूर्ण टाईमलाईन
- संविधानाच्या कलम 174(1) नुसार राज्य विधिमंडळांनी त्यांच्या शेवटच्या बैठकीपासून 6 महिन्यांच्या आत बैठक बोलावणे आवश्यक आहे. मणिपूरमधील शेवटचे विधानसभेचे अधिवेशन 12 ऑगस्ट 2024 रोजी बोलावण्यात आले होते. पण काल म्हणजेच बुधवारी विधानसभा अधिवेशन बोलावण्याची अंतिम मुदत संपली.
- तथापि, मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर राज्यपाल अजय भल्ला यांनी रविवारी सोमवारपासून सुरू होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन स्थगित केले. बिरेन सिंग यांनी त्यांच्या सरकारसमोर अविश्वास प्रस्ताव आणि महत्त्वपूर्ण बहुमत चाचणी येण्याच्या एक दिवस आधी राजीनामा दिला. ज्यामुळे राजकीय संघर्षाची शक्यता टळली.
- मे 2023 मध्ये मणिपूरमध्ये वांशिक हिंसाचार उसळल्यानंतर आणि त्यांना काढून टाकण्याची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षाच्या वाढत्या दबावादरम्यान, जवळजवळ दोन वर्षांनी त्यांचा राजीनामा आला.












Click it and Unblock the Notifications