नरेंद्र मोदींकडून सावरकरांना श्रद्धांजली; फडणवीसांनी केला 'अनादी मी, अनंत मी..' गाण्याचा सन्मान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज 26 फेब्रुवारी रोजी पुण्यतिथी आहे. सलग 21 दिवस अन्नत्याग करून तात्यासाहेबांनी देह त्यागला होता. राष्ट्रासाठी समर्पित भावनेने त्यांनी कार्य केले. त्यांच्या या योगदानाला विसरता येऊ शकत नाही. दरम्यान, महाराष्ट्रात सर्वत्र त्यांना अभिवादन केले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अजित पवार यांनी तात्यासाहेब यांना भावपूर्ण श्रद्धाजंली अर्पण केली.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
"सर्व देशवासियांच्या वतीने वीर सावरकर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरपूर्वक श्रद्धांजली. स्वातंत्र्य चळवळीतील त्यांची जिद्द, त्याग, धाडस आणि संघर्षपूर्ण अमूल्य योगदान हे कृतज्ञ राष्ट्र कधीही विसरू शकत नाही."
सभी देशवासियों की ओर से वीर सावरकर जी को उनकी पुण्यतिथि पर आदरपूर्ण श्रद्धांजलि। आजादी के आंदोलन में उनके तप, त्याग, साहस और संघर्ष से भरे अमूल्य योगदान को कृतज्ञ राष्ट्र कभी भुला नहीं सकता।
— Narendra Modi (@narendramodi) February 26, 2025
हे ही वाचा : Savarkar Death Anniversary 2025 : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे 10 प्रेरणादायी विचार, जे देतात ऊर्जा
अनादी मी अनंत मी...प्रेरणा दिन म्हणून सन्मान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सावरकर यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन केले. यावे ते म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आज आत्मार्पण दिन. कालच राज्य सरकारतर्फे नव्याने प्रारंभ करण्यात आलेला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार-2025 हा वीर सावरकरांच्या 'अनादि मी अनंत मी...' या गीताला जाहीर करण्यात आला.
मार्सेलिसच्या बंदरात वीर सावरकरांनी समुद्रात उडी घेतली होती. स्वातंत्र्याचा लढा पुन्हा जोमाने उभारण्याचा त्यांचा निर्धार होता. पण, दुर्दैवाने ते पकडले गेले. ब्रिटीशांकडून छळ होईल, हे माहिती असताना स्वत:चे आणि देशवासियांचे आत्मबल वाढविण्यासाठी वीर सावरकरांनी या गीताची रचना केली होती. हेच गीत डॉ. भरत बलवली यांनी एका कार्यक्रमात गायले होते. त्यांनी मला काल ते आवर्जून पाठविले. आज वीर सावरकरांच्या पुण्यस्मरण दिनी ते आपल्या सर्वांना निश्चितपणे एक नवीन प्रेरणा देईल. स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन!
सावरकर यांचा जन्म कुठे झाला?
विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर येथील एका सामान्य हिंदू ब्राह्मण कुटुंबात झाला. देशभक्तीच्या भावनेने सावरकरांनी सुरुवातीची वर्षे त्यांचे भाऊ गणेश मैना भाई आणि नारायण यांच्यासोबत घालवली. अवघे बारा वर्षांचे असताना सावरकरांनी विद्यार्थ्यांच्या एका गटाला मुस्लिमांच्या जमावात वळवले, यावरुन ते किती प्रभावशाली होते, याची अनुभूती येते. त्यावेळी या घटनेने सर्वत्र कहर झाला होता.
Veer Savarkar 🔥🚩 pic.twitter.com/TnzXZZjaji
— Sachin ( Modi Ka Parivar ) (@SM_8009) February 26, 2025
लहानपणापासूनच देशसेवेच्या त्यांच्या इच्छेने त्यांना क्रांतिकारक बनवले. गणेश सावरकर यांचा मोलाचा वाटा आहे. एक तरुण खेळाडू म्हणून ते प्रथम सर्वांसमोर आले. त्याच संघटनेला पुढे त्यांनी 'मित्रमेळा' असे नाव दिले.
हे ही वाचा : Veer Savarkar: काळ्या पाण्याची शिक्षा, अंदमान जेल, समुद्रात उडी, जाणून घ्या- सावरकरांचे त्यागमय जीवन
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आज आत्मार्पण दिन.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 26, 2025
कालच राज्य सरकारतर्फे नव्याने प्रारंभ करण्यात आलेला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार-2025 हा वीर सावरकरांच्या ‘अनादि मी अनंत मी...’ या गीताला जाहीर करण्यात आला.
मार्सेलिसच्या बंदरात वीर सावरकरांनी समुद्रात उडी घेतली…
काळ्या पाण्याची शिक्षा भोगली
इंग्लंडमधून उच्च शिक्षण घेऊन सावरकर भारतात परतले. तेव्हा ते व त्यांचे भाऊ गणेश सावरकर यांनी 'भारतीय परिषद कायदा 1909' विरोधात निदर्शने करण्यास सुरुवात केली. विनायक सावरकर म्हणाले की, ब्रिटीश पोलिसांनी त्यांना गुन्हेगार ठरवल्यानंतर गुन्ह्याचा कट रचल्याच्या गुन्ह्यासाठी त्यांच्या वर अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. अटकेत राहू नये म्हणून सावरकर पॅरिसला गेले. त्यानंतर 1910 मध्ये सावरकरांना ब्रिटीश पोलिसांनी पकडले.
-
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
Epfo pension : 20 दिवस उलटूनही पेन्शन क्लेम होतोय रिजेक्ट? ही आहेत कारणे; वाचा ईपीएफओचा नवा नियम -
LPG Cylinder New Rule: गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये बदल; ग्रामीण भागात आता 'इतक्या' दिवसांनी होणार बुकिंग -
Gold Price Forecast: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! 1 तोळा सोनं 2 लाखांचा टप्पा ओलांडणार? वाचा अंदाज -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस -
मनोरंजन विश्वावर शोककळा! अवघ्या 27व्या वर्षी प्रसिद्ध कलाकाराचा संशयास्पद मृत्यू -
PM Kisan 22nd Installment आज कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2 हजार रुपये; वेळ आणि स्टेटस तपासा -
Horoscope Today March 12, 2026 Marathi : गुरुवार ठरणार प्रगतीचा दिवस; वाचा तुमच्या राशीत काय आहे खास -
IPL 2026 Schedule: आयपीएलचे 15 दिवसांचे वेळापत्रक समजून घ्या; पहिल्या सामना RCB Vs हैदराबाद










Click it and Unblock the Notifications