PM Modi : भारताने ऑपरेशन सिंदूरचा संकल्प कुठे केला? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितली मोठी माहिती
PM Modi : "हा नवा भारत आहे. भारतमातेच्या शत्रूंना शिक्षा देण्यासाठी हा भारत देश जमीन-आकाश एक करतो. बिहारच्या जमीनीवरच मी ऑपरेशन सिंदूरचा संकल्प केला होता." अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली. बिहार येथे आयोजित एका सभेत ते संबोधित करत होते.
पंतप्रधान मोदी यांनी बिहारमधील मोतिहारी येथे ७,२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. त्यावेळी त्यांनी ही महत्वपूर्ण माहिती दिली.

पंतप्रधान मोदी बिहारची सभा संपताच पश्चिम बंगालमधील दुर्गापूरला रवाना होणार आहेत.तिथे ते दुर्गापूरमध्ये ५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील.
#WATCH | Bihar | PM Narendra Modi says, "... I took the resolve of Operation Sindoor from the land of Bihar and the entire world watches its success today..."
— ANI (@ANI) July 18, 2025
(Source: DD) pic.twitter.com/7pc25i4DXa
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, " बिहारमध्ये मी ऑपरेशन सिंदूरचा संकल्प केला त्याचे यश आज पुर्ण जग पाहत आहे. बिहारजवळ ना सामर्थ्याची कमी आहे ना, साधनसामुग्रीची कमतरता.. असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
'बनावेंगे नया बिहार, फिर एक बार एनडीए सरकार'
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "काँग्रेस आणि राजद मागासवर्गीयांच्या नावाखाली राजकारण करत आहेत, पण ते त्यांच्या कुटुंबाबाहेरील लोकांचाही आदर करत नाहीत. आपल्याला बिहारला त्यांच्या बेकायदेशीर हेतूंपासून वाचवायचे आहे... आपल्याला चंद्र मोहन राय सारख्या नेत्यांनी मार्गदर्शन केले... बनावेंगे नया बिहार, फिर एक बार एनडीए सरकार"
प्रधानमंत्री धन धन कृषी योजना केंद्राने मंजूर केली
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, " प्रधानमंत्री धन धन कृषी योजना केंद्राने मंजूर केली आणि त्याअंतर्गत, कृषी उत्पादनाची क्षमता जास्त असलेल्या परंतु कमी उत्पन्न असलेल्या १०० जिल्ह्यांची ओळख पटवली जाईल... त्यांना प्राधान्य दिले जाईल आणि मदत केली जाईल... याचा थेट फायदा बिहारमधील १.७५ कोटी शेतकऱ्यांना होईल"
आम्ही मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी काम
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "आम्ही मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी काम करत आहोत आणि ते आमच्या योजनांमध्ये दिसून येते. एनडीएचे ध्येय प्रत्येक मागासवर्गीयांना प्राधान्य देणे आहे... आम्ही बिहारमधील दुर्लक्षित असलेल्या मागास गावांचा विकास केला आणि आता ते देशातील पहिले गाव आहेत. बिहारमध्ये ३.५ कोटींहून अधिक महिलांना बँक खाती मिळाली... गेल्या १.५ वर्षांत २४,००० हून अधिक बिहारमध्ये स्वयंसहायता गटांना १,००० कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे... आतापर्यंत बिहारमध्ये २० हून अधिक लखपती दीदी आहेत..."
पीएम आवास योजनेतून घरं दिली
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "काँग्रेस आणि राजदच्या राजवटीत गरिबांना कायमस्वरूपी घरे मिळणे अशक्य होते, पीएम आवास योजनेअंतर्गत, आम्ही नॉर्वे, न्यूझीलंड आणि सिंगापूरच्या संपूर्ण लोकसंख्येपेक्षा जास्त घरे बिहारला दिली..."
-
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस










Click it and Unblock the Notifications