आता दहशतवादी मोकळा श्वास घेऊ शकणार नाही! पाकिस्तानात घुसून मारु! - PM मोदी काय म्हणाले वाचा 5 पाॅईंट
PM Modi Adampur Airbus Visit Updates : पाकिस्तानमध्ये असे कोणतेही स्थळ नाही, जिथे दहशतवादी मोकळा श्वार घेऊ शकणार नाही. आम्ही वेळ आली तर पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करु अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट पाकिस्तानला सुनावले, त्यांनी जगाला आणि पाकिस्तानच्या मित्रराष्ट्रांनाही एकप्रकारे ही सूचनाच दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी आदमपूर येथील एअरबस कॅम्पला भेट देण्यासाठी गेले. यावेळी त्यांनी तेथून भारतीय जवानांना आणि देशाला संबोधित केले.

1. 'कौशल दिखाया चालों में, उड़ गया भयानक भालों में'..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराणा प्रताप यांचा घोडा चेतकवर लिहिलेली कवितेच्या ओळी यावेळी वाचल्या.
'कौशल दिखाया चालों में, उड़ गया भयानक भालों में'..अशा शब्दात पाकिस्तानला सुनावले. हे शब्द केवळ चेतकच्या शौर्याचेच नव्हे तर भारताच्या सध्याच्या लष्करी सामर्थ्याचेही प्रतीक बनले आहेत. याचा सरळ अर्थ असा आहे की - भारत आता कोणाला घाबरणार नाही, भारत आता चेतकाच्या वेगाने धावणार आहे, तो शत्रूच्या भाल्यांमध्ये घुसून त्याला नष्ट करणार आहे.
Sharing some more glimpses from my visit to AFS Adampur. pic.twitter.com/G9NmoAZvTR
— Narendra Modi (@narendramodi) May 13, 2025
2. ऑपरेशन सिंदूर - भारताची दहशतवादाविरोधातील नीती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले की, ऑपरेशन सिंदूर ही साधी कारवाई नाही. ती बदलत्या भारताची रणनीती आहे. इमानदारीने ठोस निर्णय घेण्याच्या शक्तीचे ते द्योतक आहे. जेव्हा आमच्या बहिण,मुलींच्या कपाळावरील कुंकू पुसलं तेव्हा आम्ही दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून नेस्तनाबूत केले.
3. दहशतवाद्यांचे चॅलेंज अन् भारतीय लष्कराची विजयी मोहीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लष्कराची अभेद्य ताकद आणि शौर्याचा परिचय यावेळी करुन दिला व ते म्हणाले, पाकिस्तानातील दहशतवादी घाबरटासारखे लपून बसले पण ते विसरले की, त्यांनी ज्यांना आव्हान दिले ते भारतीय लष्कर, सिंधची सेना होती. याच लष्कराने शंभर दहशतवाद्यांचा खात्मा करत त्यांचे 9 दहशतवादी अड्डे उद्धवस्त केले.
4. पाकिस्तानला थेट इशारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून पाकिस्तानला थेट इशारा दिला. भारतावर डोळे वटारले तर उद्धवस्त आणि विध्वंस होईल, ज्या पाकिस्तानी लष्कराच्या भरवश्यावर दहशतवादी आहेत त्यांना आमची वायूसेना, लष्कर आणि नौसेनेने धुळ चारली आता पाकिस्तानमध्ये असे कोणतेही ठिकाण नाही जिथे दहशतवादी आरामात राहू शकतील...
5. पुढचा वार कोठे होणार- पाकिस्तानला भिती
भारताचे ड्रोन आणि मिसाईलची एवढी क्षमता आहे की, शत्रूची रात्रीची झोप उडत आहे. पाकिस्तानला प्रत्येकवेळी भिती वाटत आहे की, पुढचा वार कोठे होतो..
पंतप्रधान मोदींचा भारतीय हवाई दलाला सलाम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदमपूर हवाई तळावर भारतीय हवाई दलाच्या (IAF) कर्मचाऱ्यांना संबोधित करताना म्हटले की, "पाकिस्तानचे ड्रोन, त्यांचे UAV, विमाने आणि क्षेपणास्त्रे - सर्व आमच्या सक्षम हवाई संरक्षण प्रणालीसमोर अपयशी ठरले. मी देशातील सर्व हवाई तळांच्या नेतृत्वाचे आणि भारतीय हवाई दलाच्या प्रत्येक हवाई योद्ध्याचे मनापासून आभार मानतो. तुम्ही खरोखरच अद्भुत काम केले आहे.












Click it and Unblock the Notifications