monsoon session 2025:आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन; विरोधी पक्ष 'या' 3 मुद्द्यांवर सरकारला घेरणार!
Parliament monsoon session 2025 : आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार असून ते जवळपास एक महिना चालणार आहे. या ऑपरेशनमध्ये महत्त्वाच्या तीन विषयावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान केलेल्या दाव्यावर आणखी एक दावा केला आहे तर दुसरीकडे विरोधी पक्ष या दाव्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सविस्तर सभागृहामध्ये निवेदन करावे आणि सत्यता पुढे आणावे यासाठी विरोधी पक्ष आग्रही आहे. तशी त्यांची मागणी आहे.

भारत आणि पाकिस्तानदरम्यान, पाच जेट विमाने पाडण्यात आल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी केला होता आणि आपण हस्तक्षेप केल्यानंतर हा संघर्ष थांबल्याचे त्यांनी दावा केला आहे. या दाव्याची सत्यता आणि आणखी दोन महत्त्वाच्या विषयावर चर्चेसाठी विरोधी पक्ष आग्रही आहे, यामध्ये दुसरा विषय म्हणजे निवडणूक आयोगासंदर्भात चर्चा आणि न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव अशा तीन मुद्द्यांसंदर्भात आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात विरोधी पक्षाने सरकारला घेरण्याची रणनिती आखली आहे.
काय आहे ट्रम्प यांचा दावा
सिंदूर ऑपरेशनदरम्यान पाच जेट विमाने पाडण्यात आली असे वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले आहे. त्यामुळे आता यावरही ट्रम्प यांनी केलेले भाष्य खोटे आहे की खरे असे म्हणत विरोधी पक्षनेते राहुल गांधू यांनी पंतप्रधानांना सवाल केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचा यावेळी मोठा दावा आहे. भारत पाकिस्तान युद्ध तर आम्ही थांबवलंच. पण ज्यावेळी दोन्ही राष्ट्रांत युद्ध सुरु होते तेव्हा ते थांबवले नसते तर एका आठवड्यात अणूयुद्ध झाले असते पण आम्ही हे होऊ दिले नाही.आम्ही त्या दोघांना युद्धापासून थांबवलं असा दावा त्यांचा आहे. सविस्तर सांगायचे तर
"आम्ही युद्धे मिटवण्यात खूप यशस्वी झालो आहोत. तुमच्याकडे भारत, पाकिस्तान आहे... भारत आणि पाकिस्तानमध्ये आणखी एका आठवड्यात अणुयुद्ध झाले असते, जसे ते चालू होते. ते खूप वाईट चालले होते. आम्ही ते व्यापाराच्या माध्यमातून ती शक्यता टाळली. जोपर्यंत तुम्ही ही गोष्ट मिटवत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्याशी व्यापाराबद्दल बोलणार नाही असे उभय राष्ट्रांना म्हणालो असा त्यांचा दावा आहे.
काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी
ऑपरेशन सिंदूरदरम्यान कधीही भारत-अमेरिका व्यापार करारावर किंवा भारत आणि पाकिस्तान यांच्यात अमेरिकेने मध्यस्थी करण्याचा कोणताही प्रस्ताव मांडला नाही. लष्करी कारवाई थांबवण्याची चर्चा भारत आणि पाकिस्तान यांच्यात थेट दोन्ही सशस्त्र दलांमधील विद्यमान संपर्क माध्यमांद्वारे झाली आणि ती पाकिस्तानच्या विनंतीवरून सुरू झाली होती. भारत मध्यस्थी स्वीकारत नाही आणि कधीही स्वीकारणार नाही. या विषयावर भारतात पूर्ण राजकीय एकमत आहे, असं पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना ठामपणे सांगितले होतं. पंतप्रधान आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमधील दूरध्वनी संभाषणात ही बाब पीएम मोदींनी ट्रम्प यांना स्पष्टपणे सांगितली होती, यासंदर्भात परराष्ट्र सचिवांनी माहिती दिली होती.
आता विरोधकांची अपेक्षा काय आहे?
केंद्र सरकारने पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर या दोन्ही घडामोडी राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. त्यामुळे संसदेचे विशेष अधिवेशन घ्यावे ही मागणी विरोधकांची होती ती केंद्र सरकारने फेटाळली आहे. त्यावर विरोधी पक्षाने ऑपरेशन सिंदूरवर सरकारला घेरण्याची तयारी केली असून डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर पंतप्रधानांनी निवेदन करावे असेही विरोधकांचे म्हणणे आहे.












Click it and Unblock the Notifications