दिल्लीतील पाक उच्चायोगात आनंद साजरा करण्याची तयारी ? कर्मचारी केक घेऊन जाताना आढळला, व्हिडिओ व्हायरल
Pahalgam Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील पाकिस्तान उच्चायोगात एका व्यक्तीने केक घेऊन प्रवेश केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे.
या घटनेने सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून अनेकांनी या कृतीला पहलगाम हल्ल्याचा आनंद उत्सव म्हणून संबोधले आहे. या प्रकरणाने भारत-पाकिस्तान संबंधांवर आणखी ताण निर्माण केला असून भारताने कठोर पावले उचलताना उच्चायोगातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाक उच्चायोगात एक कर्मचारी केक घेऊन जाताना आढळला
दरम्यान 24 एप्रिल रोजी सकाळी दिल्लीतील चाणक्यपुरी परिसरात असलेल्या पाकिस्तान उच्चायोगात एक व्यक्ती केक घेऊन प्रवेश करताना दिसली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये पत्रकारांनी त्या व्यक्तीला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने कोणतेही उत्तर न देता उच्चायोगात प्रवेश केला. हा व्हिडिओ पहलगाम हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर समोर आला, ज्यामुळे अनेकांनी हा आनंद उत्सवाचा भाग असल्याचा आरोप केला. सोशल मीडियावर अनेकांनी या कृतीचा तीव्र निषेध केला आहे.
Delhi: A Pakistani national was seen carrying a cake into the Pakistan High Commission pic.twitter.com/TeUnrpsJlI
— IANS (@ians_india) April 24, 2025
या व्हायरल व्हिडिओमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. हा केक कोणत्या प्रसंगासाठी होता? हा एखाद्या खाजगी कार्यक्रमाचा भाग होता की एखाद्या संघटित 'उत्सव' प्रकारचा कार्यक्रम होता? आणि सर्वात मोठा प्रश्न असा आहे की, पहलगाम हल्ल्यानंतर लगेचच असे कृत्य का करण्यात आले? दरम्यान पाकिस्तान उच्चायुक्तालयाकडून यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलली
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने उच्चायोगातील कर्मचाऱ्यांची संख्या 55 वरून 30 वर आणण्याचा निर्णय घेतला, हा निर्णय 1 मे 2025 पर्यंत लागू होईल. तसेच, पाकिस्तान सरकारचे अधिकृत X खाते भारतात बंद करण्यात आले आहे. भारताने उच्चायोगातील सैन्य सल्लागारांना देश सोडण्याचे आदेश दिले असून अटारी -वाघा सीमा चौकी तात्काळ बंद केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक घेऊन या प्रकरणावर चर्चा केली. त्यावेळी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते. परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांनी सांगितले की, "पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणे बंद करावे, अन्यथा भारत आणखी कठोर पावले उचलेल" असं म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications