बांग्लादेशचा भारताविरोधी प्लॅन..? पाकिस्तानातून आणले २५० किलो RDX आणि मोठा शस्त्रसाठा
सत्तापालटानंतर बांग्लादेश भारतविरोधी कारवाया करताना दिसत आहेत. पाकिस्तान हा आता बांगलादेशात जवळचा मित्र बनत चालला आहे. हे दोन्ही देश आता भारताविरुद्ध काही कट रचत असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. भारताचे टेन्शन वाढवणारी बातमी आता समोर आली आहे. पाकिस्तानची राजधानी कराचीहून निघालेल्या एका जहाजातून मोठ्या प्रमाणात RDX आणि AK47 शस्त्रे बांग्लादेशला पोहोचल्याची माहिती मिळत आहे. या शस्त्रांचा वापर भारताविरुद्ध होऊ शकतो, अशी शक्यताही आता व्यक्त केली जात आहे.

काय होतं जहाजात?
एमव्ही अल बखेरा नावाचे हे जहाज कराची बंदरापासून बांग्लादेशच्या चांदपूर चितगाव बंदरात पोहोचले. त्यात सुमारे 250 किलो RDX आणि 100 पेक्षा जास्त AK47 आणि दारूगोळा लपविला होता, असे काहींचे म्हणणे आहे. हे जहाज ढाका डॉकवर येण्याऐवजी, चांदपूर बंदरावर गेले. भारतीय गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जहाजात 720 टन गुरांचे अन्न आणि भाजीपाला होता. मात्र चितगाव बंदराच्या सेफ हाऊसमध्ये मोठ्या प्रमाणात आरडीएक्स आणि शस्त्रास्त्रे आधीच उतरवण्यात आली होती.
जहाजात 7 जणांचा मृत्यू
या जहाजातील 7 जणांच्या हत्येप्रकरणी संशयित आकाश मंडल उर्फ इरफान याला अटक करण्यात आली आहे. ही अटक RAB-11 Comilla CPC-2 ने केली आहे. त्यानंतर चंदपूर येथील न्यायालयाने त्याला गुरुवारपासून सात दिवसांची कोठडी सुनावली. रिव्हर पोलिस निरीक्षक मोहम्मद कलाम खान यांनी आरोपी इरफानला 10 दिवसांची कोठडी मागितली होती, परंतु न्यायदंडाधिकारी मोहम्मद फरहान सादिक यांनी 7 दिवसांची कोठडी मंजूर केली. कोर्टात या खटल्याच्या सुनावणीदरम्यान राज्यातील 3 वकिलांनी भाग घेतला. मात्र, आरोपीची बाजू मांडण्यासाठी एकही वकील न्यायालयात उपस्थित नव्हता.












Click it and Unblock the Notifications