केवळ 'हिंदू' होते म्हणून त्यांचा जीव घेतला गेला
काश्मीर. म्हणजे जणू पृथ्वीवरचा स्वर्गचं. निसर्गाचं एवढं भरभरून देणं आहे की जणू कधीकाळी इथं देवं राहत असावे. या देवभूमीत जायला कुणाला आवडत नाही? निर्सगानं भरभरुन वरदान दिलेल्या या काश्मीरमध्ये पर्यटक मोठ्या संख्येनं जातात.
कलम ३७० रद्द केल्यानंतर तर इथला पर्यटकांचा ओघ आणखीचं वाढला. पर्यटक वाढले, रोजगार वाढला, काश्मीरचं हे नंदनवन पर्यटकांच्या पाऊलांनी खुलून गेलं. मात्र, देवांच्या या भूमीला, पर्यटकांच्या आनंदाला हैवानांची नजर लागली.

२२ एप्रिलच्या दिवशी काश्मीरमधील पहलगाममध्ये हैवानांनी थैमान घातलं. बहुसंख्य हिंदू असलेल्या या देशात केवळ हिंदू आहात म्हणून निष्पाप पर्यटकांची या धर्मांध दहशतवाद्यांनी निघृण हत्या केली.
या श्वापदांनी पर्यटकांना कलमा पठण करायला सांगितलं. कलमा पठण करता आली म्हणून डोक्यात घोळ्या घातल्या. एवढ्यावर या हैवानांच समाधान झालं नाही. त्यांनी हिंदू आहात की इतर कुणी हे तपासण्यासाठी पुरुषांना पँट काढायला लावली.
लेफ्टनंट विनय नरवाल यांची हत्या तर सुन्न करणारी आहे. विनय नरवाल यांची पत्नी हिमानीच्या हातांवरून मेहंदीचा रंगही उतरलेला नव्हता. सहा दिवसांपूर्वी लग्न झालं होतं. हनिमूनसाठी ते पहलगामला गेले होते. पण भ्याड दहशतवादी हल्ल्यात विनय यांना जीव गमवावा लागला. या घटनेनंतर हिमानी यांचा एक व्हिडिओ समोर आला होता.
यामध्ये हिमानी म्हणत होत्या की विनय भेळपुरी खात होते. यावेळी दहशतवाद्यांना विनय मुस्लिम नसल्याचे समजले आणि त्यांनी त्याला गोळ्या घातल्या. विनय नरवाल यांच्या छाती, मान आणि डाव्या हातावर दहशतवाद्यांनी गोळी झाडली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

संतोष जगदाळे यांना कलमा पठण करायला सांगितलं
पुण्यातील ५४ वर्षीय संतोष जगदाळे हे सर्वात आधी लक्ष्य झालेल्यांपैकी एक होते. त्यांची मुलगी, २६ वर्षीय आसावरी जगदाळे यांच्या म्हणण्यानुसार, बंदूकधार्यांनी त्यांना तंबूतून बाहेर पडून कलमा म्हणायला सांगितलं. जेव्हा संतोष जगदाळे तसं करू शकले नाही, तेव्हा या धर्मांध हैवानांनी त्यांच्या डोक्यात, कानामागे आणि पाठीत गोळ्या झाडल्या. महाराष्ट्रातील ६ निष्पाप पर्यटकांना या हल्ल्यात जीव गमवावा लागला.
मंजुनाथ यांचा पत्नीसमोर घेतला जीव
कर्नाटकचे व्यापारी मंजुनाथ यांची क्रूर हत्याही हादरवून टाकणारी आहे. मंजुनाथ यांना त्यांची पत्नी पल्लवीसमोर दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार मारलं. एका टीव्ही चॅनेलशी बोलताना पल्लवी म्हणाल्या, "मी दहशतवाद्यांना सांगितले की तुम्ही माझ्या पतीला मारलं, मलाही मारून टाका." यावर दहशतवादी म्हणाले, आम्ही तुम्हाला मारणार नाही, जाऊन मोदींना हे सांगा.
हा हल्ला मन सुन्न करणारा आहे. दहशतवादाला धर्म नसतो असं सांगितलं जातं मग धर्म विचारून मारलं जातं? त्याला तुम्ही काय म्हणणार? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. बहुसंख्य हिंदू असलेल्या या देशात हिंदू असण्याची एवढी मोठी किंमत चूकवावी लागेल, असा विचारही कुणी करू शकत नाही. या हल्ल्यात बळी गेलेल्या निष्पाप हिंदूंना न्याय मिळेल अशी अपेक्षा आता सारे जण करताहेत.












Click it and Unblock the Notifications