Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Pahalgam Attack : 'पाकिस्तानचे पाणी रोखले, दूतावास बंद, नो व्हिसा', सीसीएस बैठकीतील 5 मोठे निर्णय

Pahalgam Terrorist Attack Update News, Narendra Modi : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने मोठी कारवाईचे संकेत दिले आहेत.

तसेच बुधवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) च्या बैठकीत पाच प्रमुख निर्णय घेण्यात आले आहेत. यात पाकिस्तानचे सिंधू पाणी करार रोखण्यात आला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानी लोकांना भारताचा व्हिसा देण्यात येणार नाही.

Pahalgam Terror Attack

बैठकीत झालेले प्रमुख पाच निर्णय कोणते?

  • सिंधू पाणी करार रोखण्यात आला.
  • अटारी सीमेवरून होणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे.
  • पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा तात्काळ रद्द करण्यात आले. 48 तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश.
  • पाकिस्तानमधील भारतीय दूतावास बंद केले जाईल तसेच भारतातील पाकिस्तानी दूतावास देखील बंद करण्याचा निर्णय झाला.
  • पाकिस्तानी राजदूतांनी 7 दिवसांच्या आत देश सोडावा.
  • पुढील निर्णय होईपर्यंत कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला भारतीय व्हिसा मिळणार नाही.

मोदींच्या निवासस्थानी अडीच तास चालली बैठक

पंतप्रधान निवासस्थानी नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अडीच तासांची बैठक झाली. त्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, एनएस अजित डोभाल यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

पहलगाम हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू

पहलगाम हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला आहे. 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. बैसरन खोऱ्यात मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित असताना हा हल्ला झाला.

मृतांमध्ये या राज्यातील लोकांचा समावेश

मृतांमध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि ओडिशातील पर्यटकांचा समावेश आहे. नेपाळ आणि युएईमधील प्रत्येकी एक पर्यटक आणि दोन स्थानिक नागरिकांचाही मृत्यू झाला.

संशयित दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी

सुरक्षा आणि गुप्तचर संस्थांनी पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी केले आहेत. त्यांची नावे आसिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा असल्याचे सांगण्यात आले आहे.

गुप्तचर सूत्रांनी सांगितले की, हल्ल्याचा मास्टरमाइंड लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख सैफुल्ला खालिद आहे, जो पाकिस्तानात उपस्थित आहे. प्राथमिक तपासात या हल्ल्यात ५ दहशतवादी सहभागी असल्याचे समोर आले आहे. यापैकी दोन स्थानिक आणि तीन पाकिस्तानी दहशतवादी होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+