मोठी बातमी! टार्गेट कसे करायचे? वेळ, काळ तुम्ही ठरवा! भारतीय लष्कराला PM मोदींची मोकळीक
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध तणावपूर्ण झाले आहेत, आधीच तणावपूर्ण असलेल्या संबंधात आता मोठी भर पडली आहे. अशातच आता भारत रणनिती आखत असून एक मोठी बातमी आता समोर आली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने आक्रमक पवित्रा स्विकारला आहे. पाकिस्तानची पाणीकोंडी केल्यानंतर इतर आघाड्यांवर सुद्धा पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न भारत सरकारकडून केला जात आहे.

दरम्यान, भारतीय लष्कराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी मोकळीक दिली असून टार्गेट कसे करायचे, वेळ कोणती आणि कधी करायचे हे तुम्हीच ठरवा असे स्पष्ट करत पंतप्रधान मोदी यांनी भारतीय लष्करावर पुर्ण विश्वास असल्याचे म्हटले आहे.
PM Narendra Modi affirmed that it is our national resolve to deal a crushing blow to terrorism. PM expressed complete faith and confidence in the professional abilities of the Indian Armed Forces. PM said that they have complete operational freedom to decide on the mode, targets,… https://t.co/2Az8nieCeW pic.twitter.com/avIVpsBNjt
— ANI (@ANI) April 29, 2025
यासंदर्भात एनआयएने भारत सरकारच्या सूत्रांचा हवाला देत वृत्त दिले आहे. दहशतवादाचा मुकाबला करणे हा आमचा राष्ट्रीय संकल्प असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. पंतप्रधानांनी भारतीय सशस्त्र दलांच्या व्यावसायिक क्षमतेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमच्या प्रतिसादाची पद्धत, लक्ष्य आणि वेळ यावर निर्णय घेण्याचे त्यांच्याकडे (भारतीय सैन्याकडे) पूर्ण ऑपरेशनल स्वातंत्र्य आहे असे या वृत्तात म्हटले आहे.
#WATCH | PM Narendra Modi chairs a meeting with Defence Minister Rajnath Singh, NSA Ajit Doval, CDS and chiefs of all the Armed Forces. pic.twitter.com/Wf00S8YVQO
— ANI (@ANI) April 29, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, NSA अजित डोवाल, CDS आणि सर्व सशस्त्र दलांच्या प्रमुखांची बैठक घेतली. याबैठकीत अधिकृतरित्या माहिती अद्याप समोर आलेली नाही.
अडीच तास चालली बैठक!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज 29 एप्रिल 2025 रोजी उच्चपातळीवर एक बैठक झाली. या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी हेही उपस्थित होते. सुमारे अडीच तास ही बैठक चालली.
जागरणने वृत्तसंस्था पीटीआयच्या हवाल्यानुसार वृत्त दिले आहे. त्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सैन्यावर पुर्ण विश्वास असल्याचे म्हटले आहे. लक्ष निश्चित करणे, लक्ष्याची पद्धत आणि काळ वेळ या महत्वाच्या गोष्टी लष्कर ठरवू शकते त्यांना ही मोकळीक आहे असे पतंप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतावादाविरोधात कडक पाऊले उचलणार असल्याचे संकेत दिले आहे. ज्यावेळी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी या हल्ल्यातील आरोपी आणि त्यांना सहकार्य करणाऱ्यांना सोडणार नाही असे म्हणत आपले मनसुबे स्पष्ट केले होते. तसेच लवकरच आपण यासंदर्भात बैठक घेऊ असेही स्पष्ट केले होते.
पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या संकेतानुसार आता ही बैठक झाली असून सुत्रांच्या माहितीनुसार, दहशतवादी कारवाया आणि त्याला आळा कसा घालायचा यासंदर्भात चर्चा झाल्याचे समजते, ही बैठक अडीच तास चालली.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा











Click it and Unblock the Notifications