नरेंद्र मोदींची कन्याकुमारीत ध्यानधारणा
Mumbai: लोकसभा निवडणुकीचा ७ व्या टप्प्याचा प्रचार संपताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४५ तासांचे अनुष्ठान सुरू केले. अनुष्ठान व्रताच्या तिसऱ्या दिवशी त्यांनी सर्वप्रथम "सूर्य अर्ध्य" केले. त्यांच्या या अनुष्ठान व्रतावर विरोधी पक्षांनी टीका केली आहे आणि भाजपकडूनही या टिकेला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
कन्याकुमारी येथे ध्यानधारणा
ध्यानधारणेसाठी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विवेकानंद स्मरकाची निवड केली, कन्याकुमारी हे भारताचे दक्षिण टोक आहे. मोदींच्या ध्यानधारणा व्रताची घोषणा होताच विरोधकांनी हल्लाबोल सुरू केला. मात्र मोदी आपल्या निश्चयावर ठाम राहिले. निराहार, पाणी आणि फळांचा रस एवढ्यावर मोदी आपले अनुष्ठान करीत आहेत.

विरोधकांची तक्रार
नरेंद्र मोदी यांच्या कोणत्याही कृतीला माध्यमांत चांगलीच प्रसिद्धी मिळते. मोदींच्या या व्रताला चांगली प्रसिद्धी मिळणार हे उघड होते. प्रत्यक्ष मतदानाच्या आधी दोन दिवस प्रचार बंद करण्यात येतो. मात्र मोदी व्रताला बसताच त्याला प्रसिद्धी मिळेल आणि त्यांचा प्रचार होईल, या भीतीने विरोधकानी यंत्रणांकडे धाव घेतली आणि या व्रताला प्रसिद्धी देण्यास बंदी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
२०१९ मध्ये केदारनाथ येथे ध्यानधारणा
२०१९ साली झालेल्या निवडणुकीत शेवटच्या टप्प्याचा प्रचार संपल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ येथील गुहेत ध्यानधारणा केली होती. त्यावेळी देखील विरोधकांनी त्यांची चांगलीच खिल्ली उडवली होती. मात्र त्यावर मोदी यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नव्हती. आताही मोदी यांनी कन्याकुमारी येथे ध्यानधारणा केल्याने विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.
राम मंदिर प्रतिष्ठापनेच्या वेळीही कठोर व्रत
दरम्यान, अयोध्या येथील राम मंदिरात रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेच्या वेळी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर अनुष्ठान केले होते. हे अनुष्ठान तब्बल ११ दिवस सुरू होते. ११ दिवस फलाहार आणि जमिनीवर शयन असे त्यांच्या अनुष्ठानचे स्वरूप होते. त्याची एकच चर्चा देशभरात झाली होती.
उत्तर भारतावर प्रभावाची चर्चा
भाजपचा प्रभाव सर्वाधिक उत्तर भारतात आहे. तिथे भाजपच्या हिंदुत्ववादी विचारधारेला चांगला प्रतिसाद मिळतो. लोकसभा निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात उत्तर भारतात मतदान होत आहे. आणि प्रत्यक्ष मतदानाच्या आधी काही तास मोदींनी ही अनुष्ठान सुरू केले आहे. त्यामुळे उत्तर भारतातील हिंदू मतदार भाजपकडे आकर्षित होण्याची भीती विरोधकांना वाटत आहे. त्यामुळेच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ध्यान धारणेवर सर्वच विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे.












Click it and Unblock the Notifications