भुकंपग्रस्त म्यानमारसाठी भारताने सुरु केलेले 'ऑपरेशन ब्रम्हा' नेमके काय? मोदी काय मदत करणार? वाचा

म्यानमारमध्ये शुक्रवारी झालेल्या शक्तीशाली भुकंपामुळे एक हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. म्यानमारच्या शेजारच्या देशांमध्येही ७.७ तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. शेजारच्या देशांमध्येही या भूकंपात मृतांची संख्या १,००२ असल्याची पुष्टी बीबीसीने केली. भूकंपाचे केंद्रबिंदूजवळील असलेल्या मंडालेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. आता याच म्यानमारला मदत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'ऑपरेशन ब्रम्हा'ची घोषणा केली आहे.

PM Modi Operation Brahma is underway

काय आहे 'ऑपरेशन ब्रम्हा'?

थायलंड आणि म्यानमारमध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर भारताने 'ऑपरेशन ब्रह्मा' अंतर्गत १५ टन मदत साहित्य म्यानमारला पाठवले. पीटीआयने याबाबत वृत्त दिले आहे. एका C130J विमानाने यंगूनला तंबू, ब्लँकेट, अन्न, पाणी शुद्धीकरण यंत्र आणि औषधे यासह साहित्य पोहोचविण्यात आले आहे. मदत घेऊन जाणारी आणखी दोन भारतीय हवाई दलाची विमाने लवकरच रवाना होतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी 'एक्स' वर पोस्ट केले की, " ऑपरेशनब्रह्मा सुरू झाले आहे. भारताकडून मानवतावादी मदतीचा पहिला टप्पा म्यानमारमधील यंगून विमानतळावर पोहोचला आहे."

काय म्हणाले पीएम मोदी

या भुकंपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, "भारत सर्व शक्य मदत करण्यास तयार आहे," त्यांनी भारतातील सर्व अधिकाऱ्यांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहे. ऑपरेशन ब्रम्हा अंतर्गत म्यानमार व थायलंडला शक्य तेवढी सगळी मदत पुरविण्यात येणार आहे. भारताचे तीन विमाने ही मदत घेऊन जातील, असे प्राथमिक माहितीत सांगण्यात आले आहे.

कोठे झाले भूकंपाचे परिणाम?

म्यानमार आणि थायलंडमध्ये बचाव कर्मचारी अजूनही वाचलेल्यांना शोधण्यासाठी झटत आहेत. भूकंपामुळे म्यानमारच्या विविध भागात इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. पूल कोसळून आणि रस्तेही तुटले आहेत. थायलंडची राजधानी बँकॉकमध्येही बांधकामाधीन ३० मजली गगनचुंबी इमारत कोसळली. तेव्हा अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी बचावकर्ते ढिगाऱ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. बँकॉकचे गव्हर्नर चॅडचार्ट सिट्टीपुंट यांनी एएफपीला सांगितले की, शहरात सुमारे १० जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, त्यापैकी बहुतेक जण गगनचुंबी इमारत कोसळल्याने झाले आहेत. परंतु पर्यटकांसाठी आकर्षण असलेल्या चतुचक वीकेंड मार्केटजवळील इमारतीत अजूनही १०० कामगार बेपत्ता आहेत.

जगाने कशी दिली प्रतिक्रिया?

भारताने एक शोध आणि बचाव पथक आणि वैद्यकीय पथक तसेच तरतूदी पाठवल्या. मलेशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, देश रविवारी ५० जणांना सर्वात जास्त नुकसान झालेल्या भागात मदत करण्यासाठी पाठवेल. संयुक्त राष्ट्रांनी मदत कार्य सुरू करण्यासाठी ५ दशलक्ष डॉलर्सची तरतूद केली आहे. अमेरिकेने प्रतिसादात मदत करणार असल्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितले. रशियाच्या राज्य वृत्तसंस्था टासच्या वृत्तानुसार, रशियाच्या आपत्कालीन मंत्रालयाने १२० बचावकर्ते आणि साहित्य घेऊन दोन विमाने पाठवली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+