मोदी सरकारची शेतकऱ्यांना दिवाळी भेट; पिकांच्या MSP मध्ये मोठी वाढ, या पिकांचा केला समावेश
नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने दिवाळी पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने 2024-25 च्या विपणन हंगामासाठी सर्व आवश्यक रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ करण्यास मान्यता दिली आहे.
शेतकऱ्यांना पिकांना योग्य भाव मिळावा यासाठी सरकारने विपणन हंगाम 2024-25 साठी रब्बी पिकांच्या एमएसपीमध्ये मोठी वाढ केली आहे. एमएसपीमध्ये सर्वाधिक वाढ ही कडधान्यांसाठी केली आहे. यात सर्वाधिक मसूर दाळसाठी प्रति क्विंटल 425 रुपयांनी वाढ केली आहे.

यासोबतच मोहरीसाठी 200 रुपये प्रतिक्विंटल दर मंजूर करण्यात आला आहे. गहू आणि करडईसाठी प्रत्येकी 150 रुपये प्रतिक्विंटल वाढ मंजूर करण्यात आली आहे. बार्ली आणि हरभऱ्यासाठी प्रतिक्विंटल 115 रुपयांची वाढ मंजूर करण्यात आली आहे. गव्हाच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 150 रुपयांच्या वाढीमुळे नवीन दर 2,425 रुपये प्रति क्विंटल झाला आहे, जो पूर्वी 2,275 रुपये होता. या वाढीमुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. सर्वाधिक गहू भारताच्या उत्तरेकडील प्रदेशांमध्ये पिकवला जातो. त्यामुळे तेथील शेतक-यांना मोठा होणार आहे.
गव्हाच्या पिकासोबतच मोहरी आणि हरभऱ्याच्या एमएसपीमध्येही वाढ करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत मोहरीच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 300 रुपयांची वाढ केल्यानंतर मोहरीचा एमएसपी प्रति क्विंटल 5,950 रुपये झाला आहे. मोहरीची लागवड प्रामुख्याने राजस्थान, हरियाणा आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये केली जाते.
Central Government notifies MSP for 6 crops in Rabi marketing season for 2025-26.
— ANI (@ANI) October 16, 2024
Wheat - Rs 2425 from Rs 2275
Barley - Rs 1980 from Rs 1850
Gram - Rs 5650 from Rs 5440
Lentil - Rs 6700 from 6425
Rapeseed/Mustard - Rs 5950 from Rs 5650
Safflower - Rs 5940 from Rs 5800 pic.twitter.com/Poqn53RtXj
दरम्यान या वाढीचा उद्देश शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवून देणे आणि मोहरी लागवडीला चालना देणे हा आहे. त्याचप्रमाणे हरभरा या प्रमुख कडधान्य पिकासाठी एमएसपी प्रति क्विंटल 210 रुपयांनी वाढवून तो 5,650 रुपयांवर गेला आहे. हरभरा संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. तसेच भारतीय आहारात हरभ-याचं मोठ्या प्रमाणात वापरा केला जातो. तसेच सर्वाधिक प्रोटिन असलेला एक महत्त्वाचा भाग आहे.
एमएसपी मधील या वाढीमुळे डाळींच्या उत्पादनाला चालना मिळणार आहे. विशेषकरुन मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये शेतक-यांना चांगला आर्थिक परतावा मिळेल अशी अपेक्षा आहे. एवढेच नाही तर अन्नसुरक्षा वाढवण्यासाठी, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी तेलबिया, कडधान्ये आणि बाजरी/भरड तृणधान्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकार पीक विविधीकरणाला प्रोत्साहन देत आहे.
-
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!








Click it and Unblock the Notifications