सत्संगाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरीत 120 जणांचा मृत्यू झाल्याची शंका उत्तर प्रदेशमधील घटना
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. हाथरसच्या रतीभानपूरमध्ये सत्संगाच्या वेळी चेंगराचेंगरी झाली. या अपघातात 120 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. स्थानिक वृत्तानुसार, आतापर्यंत 120 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात बहुतांशी महिला आहेत. अजून मृत्यूची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे.

महिला आणि मुलांना एटा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार एकूण 15 महिला आणि मुलांना एटा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे, तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे आणखी मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
हाथरस येथील रतीभानपूर येथे भगवान शिवाच्या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम संपताच चेंगराचेंगरी झाली, त्यात महिला आणि लहान मुलांसह अनेक जण जखमी झाले. एटा एसएसपी राजेश कुमार सिंह म्हणाले, "हाथरस जिल्ह्यातील मुगलगढ़ी गावात एक धार्मिक कार्यक्रम सुरू असताना चेंगराचेंगरी झाली. एटाह रुग्णालयात आतापर्यंत 27 मृतदेह दाखल झाले आहेत, ज्यात 23 महिला, 3 मुले आणि 1 पुरुषाचा समावेश आहे. 27 मृतदेहांची ओळख पटवणे सुरू आहे.
#WATCH | Uttar Pradesh: Etah SSP Rajesh Kumar Singh says, "... A religious event was going on in Mughalgarhi village of Hathras district when the stampede occurred. So far 27 dead bodies have been received in the Etah Hospital, including 23 women, 3 children, and 1 man. The… https://t.co/Ih37mRehAY pic.twitter.com/xJa3AN4Yo4
— ANI (@ANI) July 2, 2024
सीएम योगींनी व्यक्त केले शोक:
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री योगी यांनी हातरस जिल्ह्यातील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे.
#UPCM @myogiadityanath ने जनपद हाथरस में हुए हादसे में मृतकों के शोक संतप्त परिजनों के प्रति संवेदना व्यक्त की है। साथ ही घायलों के शीघ्र स्वस्थ होने की कामना की है।
— CM Office, GoUP (@CMOfficeUP) July 2, 2024
उन्होंने जिला प्रशासन के अधिकारियों को घायलों को तत्काल अस्पताल पहुंचाकर उनके समुचित उपचार कराने और मौके पर राहत…
तसेच जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. जखमींना तात्काळ रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर योग्य ते उपचार करावेत आणि घटनास्थळी मदतकार्याला गती द्यावी, अशा सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. एडीजी आग्रा आणि अलिगढ आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली घटनेच्या कारणाचा तपास करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications