Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

वायनाडमध्ये भुसख्खलन! आतापर्यंत 89 जण ठार, लष्कर, हेलिकाॅप्टरद्वारे मदत, केरळात 2 दिवसांचा दुखवटा

वायनाड - मुसळधार पावसामुळे केरळमधील वायनाड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले असून, त्यात आतापर्यंत 80 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक लोक अजूनही ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत, त्यांना बाहेर काढण्याचे काम वेगाने सुरू आहे. दरम्यान, केरळ सरकारने दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकारने लष्कराची मदत मागितली आहे. वायनाड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे टेकड्यांवरून माती आणि खडक घसरले, त्यामुळे गावांमध्ये आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात मलबा साचला आहे.

heavy rains in Wayanad  Kerala 8 people died in a landslide

मृतात दोन मुलांचा समावेश

केरळमधील वायनाड जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यरात्री भूस्खलनाच्या घटना घडल्या असून यात 44 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मातीच्या ढीगाऱ्याखाली अनेक जण अडकून पडले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर मृतांचा आकडा देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. वायनाडमधील मेपड्डीच्या डोंगराळ भागात हे भूस्खलन झाले आहे.

heavy rains in Wayanad  Kerala 8 people died in a landslide

बचावकार्य सुरु

या घटनेची माहिती मिळताच तातडीने केरळ सरकारने बचाव कार्य हाती घेतलं आहे. मुख्यमंत्री पी. विजयन यांनी सांगितलं की, बचाव कार्यात सर्व सरकारी यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. स्थानिक लोकांच्या मते परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. सततच्या मुसळधार पावसामुळे बचावकार्यात गुंतलेल्या पथकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रात्री दोन वाजता कोसळली दरड

मेपड्डी येथे रात्री दोनच्या सुमारास दरड कोसळण्याची पहिली घटना घडली. आज पहाटे 4.10 वाजता पुन्हा भूस्खलन झाले. बचाव कार्यासाठी हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर, एक एमआय 17 आणि एलएच ही हेलिकॉप्टर सुलूरला पाठवण्यात आली आहेत. मेपड्डी येथील रुग्णालयात 16 जणांवर उपचार सुरू करण्यात आले आहे.

केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, बाधित भागात अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची टीम तैनात करण्यात आली आहे. याशिवाय एनडीआरएफची अतिरिक्त टीम लोकांना वाचवण्यासाठी तैनात करण्यात आली आहे. त्याचबरोबर कन्नूर डिफेन्स कॉर्प्सच्या दोन तुकड्यांनाही सूचना देण्यात आल्या असून त्या देखील बचाव कार्य करण्यासाठी रवाना झाल्या आहेत. केएसडीएमएने फेसबुकवर याबाबत पोस्टही केली आहे.

48 तासात अतिवृष्टीचा इशारा

भारतीय हवामान विभागाने केरळच्या मलप्पुरम आणि कन्नूर जिल्ह्यांसाठी पुढील 48 तासांत अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. केरळमधील कोल्लम, अलाप्पुझा, कोट्टायम, एर्नाकुलम, थ्रिसूर आणि मलप्पुरम जिल्ह्यांमध्ये पुढील 3 तासांत काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. याशिवाय ताशी 50 किमी वेगाने जोरदार वारे वाहण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+