Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महाकुंभात आज शेवटचे स्नान, महाशिवरात्रीचा योग, हर हर महादेवाचा जयघोष!15,000 हून जास्त रेल्वे

Mahashivratri Mahakumbh 2025 : प्रयागराज येथे सुरु असलेल्या महा कुंभमेळ्याचा आज 26 फेब्रुवारी 2025 शेवटचा दिवस आहे. महाकुंभाचा शेवटचा दिवस आणि दुसरीकडे महाशिवरात्री यामुळे हा चांगला योग असल्याने शिवस्नानासाठी मोठी गर्दी होत आहे. आज भाविक गंगेत डुबकी मारुन शाहीस्नान करत आहेत. हा आकडा कोट्यवधीपर्यंत आज जाणार आहे.

महाकुंभ कोट्यवधी भाविकांचा साक्षीदार ठरला असून, महाकुंभात आतापर्यंत ६4 कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र त्रिवेणी संगमात स्नान केले आहे. बुधवारी महाशिवरात्रीनिमित्त अखेरच्या स्नानासाठी कोट्यवधी भाविक जमणार असून, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी उत्तर प्रदेश सरकार आणि प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

Mahashivratri Mahakumbh 2025 last snan today

15 हजारांहून अधिक विशेष रेल्वेगाड्या

महाशिवरात्रीच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड आणि बंगालसह इतर राज्यातून मोठ्या संख्येने भाविक प्रयागराजला पोहोचले आहेत.

गर्दी लक्षात घेता रेल्वे विभागाने 15,000 हून अधिक विशेष गाड्या देखील चालवल्या आहेत आणि सर्व प्रमुख स्थानकांवर सुरक्षा आणि सहाय्यक कर्मचारी तैनात केले आहेत.

4500 हजार विशेष बसगाड्या

इतकेच नाही तर उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाने भाविकांच्या सोयीसाठी 4500 बसेस चालवल्या आहेत, जेणेकरून ते सुरक्षित आणि व्यवस्थितपणे त्यांच्या नियोजित ठिकाणी पोहोचू शकतील.

मोठ्या कार्यक्रमांवर बंदी : महाशिवरात्रीला प्रयागराज येथे येणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता, गर्दी टाळता यावी आणि भाविकांना शांततेत प्रार्थना करण्याची संधी मिळावी यासाठी कोणताही सार्वजनिक उत्सव किंवा मोठा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही.

काय म्हणाले महाकुंभ व्यवस्थापन करणारे डिआयजी?

  • महाकुंभचे डीआयजी वैभव कृष्णा म्हणाले की, स्नानादरम्यान भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्व शिवमंदिरांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून स्नानाच्या घाटांवर सुरक्षा दले उपस्थित असतील.
  • महाकुंभ परिसर नो व्हेइकल झोन घोषित करण्यात आला असून वाहतूक व्यवस्थापित करण्यासाठी आणखी 6 आयपीएस अधिकारी पाठवण्यात आले आहेत.
  • प्रयागराजमध्ये महाकुंभाच्या महाशिवरात्री स्नानासाठी आयपीएस अधिकारी तैनात करण्यात आले असून, त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
  • एडीजी पीएसी सुजित पांडे यांच्या नेतृत्वाखालील इतर पाच आयजी अधिकाऱ्यांनाही विविध मार्गांची जबाबदारी देण्यात आली आहे.

माघ पौर्णिमा आणि महाशिवरात्रीला अमृतस्नान का मानले जाणार नाही?

  • महाकुंभातील अमृतस्नानाच्या तारखा ज्योतिषीय गणनेनुसार ठरतात. यासाठी सूर्य मकर राशीत आणि गुरु वृषभ राशीत असणे आवश्यक मानले जाते.
  • मकर संक्रांती, मौनी अमावस्या आणि वसंत पंचमीच्या दिवशी ही परिस्थिती निर्माण झाली होती, म्हणून त्यांना अमृतस्नानाचा दर्जा मिळाला.
  • माघ पौर्णिमेला (24 फेब्रुवारी) सूर्य कुंभ राशीत प्रवेश करेल, तर गुरू वृषभ राशीत राहील.
  • महाशिवरात्रीच्या दिवशी (26 फेब्रुवारी2025 ) सूर्य कुंभ राशीत असेल, त्यामुळे या स्नानांना अमृतस्नानाचा दर्जा मिळणार नाही.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+