Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

MahaShivratri: 'या' राज्यात महाशिवरात्रीला द्राक्ष दिन का साजरा केला जातो, त्यामागील महत्त्व काय?

MahaShivratri 2025 : महाशिवरात्र भगवान शिवाच्या आराधनेचा दिवस. यंदा 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री दिन आहे. शिवपूजेच्या विविध पद्धती व विविध धारणा आहेत. प्रत्येक राज्यात शिवपूजा विविध पद्धतीने साजरी केली जाते. महाराष्ट्रामध्ये देखील सांगली जिल्ह्यात महाशिवरात्रीचा दिवस द्राक्ष दिन म्हणून साजरा केला जातो. या उपक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि द्राक्ष लागवडीला प्रोत्साहन देणे आहे. यावर्षी, महाराष्ट्रातील साडे तीनशेहून अधिक ठिकाणी हा उत्सव साजरा केला जात आहे.

नेमका उद्देश काय आहे त्यामागील कारण?

देवांना सीताफळ किंवा नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे. त्याचप्रमाणे ऋतूनुसार फळे अर्पण करण्याची परंपरा आहे. जसे अक्षय्य तृतीयेला आंबा किंवा संक्रांतीला गाजर. महाशिवरात्री हा सण शिव-पार्वतीच्या लग्नाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. या दिवशी भगवान शिवाची पूजा केली जाते. या प्रसंगी, अनेक भक्त शिवलिंगाला फळे अर्पण करून शिवरात्री साजरी करतात.

Mahashivratri 2025

महाराष्ट्रात साडे तीनशे ठिकाणी हा उत्सव?

यश अंगूर नागरी शेतकरी उत्पादक कंपनीने महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या मदतीने हा उपक्रम आणखी विस्तारित करण्याचा संकल्प केला आहे. या वर्षी हा दिवस महाराष्ट्रातील साडे तीनशेहून अधिक ठिकाणी द्राक्ष दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. हा उपक्रम परळी वैजनाथ, शिखर शिंगणापूर, महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर, रेवण सिद्ध, दंडोबाचा डोंगर आणि इतर अनेक तीर्थस्थळांपर्यंत विस्तारित केला जाईल. याशिवाय, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सर्व शेतकरी त्यांच्या गावातील मंदिराबाहेर द्राक्षे विकून या उपक्रमात सामील होतील.

लोकांनी द्राक्षे खाऊन महाशिवरात्री साजरी करावी

शेतीविषयक तज्ज्ञांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, देशभरात स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी जलेबी खाऊन राष्ट्रीय सण साजरे केले जातात. त्याचप्रमाणे, लोकांनी महादेवाचे आवडते फळ द्राक्षे खाऊन महाशिवरात्री साजरी करावी. महाशिवरात्रीच्या दिवशी, शेतकऱ्यांकडून थेट गोड, ताजी द्राक्षे मंदिराबाहेर स्वस्त दरात विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जातात.

देशभरात ही संकल्पना पोहोचली पाहिजे...

महाशिवरात्रीला हा द्राक्ष दिन केवळ महाराष्ट्र आणि कर्नाटकातच नव्हे. तर संपूर्ण भारतात पसरवला पाहिजे. परंपरेतून बाजारपेठ निर्माण करून शेतकऱ्यांना फायदा मिळवून देणे हा मागील उद्देश असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. म्हणून महाशिवरात्रीला द्राक्ष दिन साजरा केला जाणार आहे. तर सांगली जिल्ह्यात हा उपक्रम होताच, आता त्याची वाढ यंदा राज्यभरात पाहायला मिळणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+