महाकुंभातील व्हीआयपी घाटांवर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांचा आक्षेप, म्हणाले- भेदभावाला स्थान नाही
MahaKumbh Mela 2025: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील 2025 च्या महाकुंभासाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. 13 जानेवारीपासून शाही स्नानाने महाकुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे.
14 जानेवारी रोजी संक्रांती स्नानसाठी लाखोंच्या संख्येने भाविकांनी प्रयागराज येथे गर्दी केली आहे. प्रयागराजमध्ये या महाकार्यक्रमासाठी एक नवीन शहर उभा करण्यात आलं आहे, जिथे लाखो भाविकांसाठी तंबू निवास, भोजन सेवा, स्वच्छता सुविधा आणि विशेष व्हीआयपी घाट तयार करण्यात आले आहेत.

हा कार्यक्रम ऐतिहासिक आणि सुव्यवस्थित करण्यासाठी सरकार सज्ज आहे. महाकुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी व्हीआयपी घाटांच्या संकल्पनेवर टीका केली आहे. शंकराचार्य म्हणाले आहे की, "असा भेदभाव धार्मिक परंपरा आणि समानतेच्या भावनेच्या विरुद्ध आहे. कुंभमेळ्यासारख्या पवित्र कार्यक्रमात प्रत्येक भक्ताला समान अधिकार आणि आदर मिळाला पाहिजे".
शंकराचार्यांनी व्हीआयपी घाटांवर टीका
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी व्हीआयपी घाटांबद्दल असहमती व्यक्त केली आहे. धार्मिक पद्धतींमध्ये अशा विशिष्टतेला जागा नाही यावर त्यांनी भर दिला आहे. "आपल्या धर्मात यासाठी कोणतीही तरतूद नाही.कोणताही भेदभाव न करता सर्वांनी एकाच घाटावर स्नान करावे ". अलिकडच्याच एका मुलाखतीत, शंकराचार्यांनी म्हटलं आहे की, की माँ गंगेच्या दृष्टीने सर्वजण समान आहेत. त्यांनी प्रश्न केला की आई आपल्या मुलांमध्ये त्यांच्या पोशाखाच्या आधारावर भेदभाव करेल का? "आईच्या कुशीत कोणी व्हीआयपी नसतो," असं त्यांनी म्हटलं आहे.
सनातन धर्मातील एकता
शंकराचार्य यांनी सनातन धर्मातील जातीभेदांबद्दलच्या गैरसमजुतींवर ही त्यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, राजकारणी जरी असा दावा करत असले तरी धर्मात हे खरे नाही. सनातन धर्मात कोणत्याही प्रकारचा जातीयवाद नाही. कुंभमेळ्याची परंपरा शतकानुशतके सर्वसमावेशक आहे. तसेच कुंभमेळ्यादरम्यान सर्व पार्श्वभूमीचे लोक, जाती किंवा दर्जाची पर्वा न करता, स्नान करण्यासाठी एकत्र येतात. ही एकता सनातन धर्माच्या मूळ मूल्यांचे प्रतिबिंब आहे, जिथे कुंभमेळ्यासारख्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सर्वांना समान वागणूक दिली जाते.












Click it and Unblock the Notifications