मध्य प्रदेश : लहान मुलांच्या अंगावर भिंत कोसळली, ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे 9 निष्पापांचा मृत्यू
मध्य प्रदेशात रविवारी एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान भिंत कोसळून 9 मुलांचा मृत्यू झाला आहे. अंगावर पडलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली ही मुले गाडली गेली. या अपघातात इतर अनेक मुले जखमी झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सागर जिल्ह्यातील शाहपूर गावात एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान ही घटना घडली. सागरचे विभागीय आयुक्त वीरेंद्र सिंह रावत यांनी पीटीआयला दिलेल्या माहीती नुसार शाहपूरमध्ये एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 ते 15 वर्षे वयोगटातील नऊ मुलांचा मृत्यू झाला आहे.

सागरचे जिल्हाधिकारी दीपक आर्य म्हणाले की, आता घटनास्थळावरून सर्व मलबा हटवण्यात आला आहे. सागरचे जिल्हाधिकारी दीपक आर्य म्हणाले, "सकाळी 8.30 च्या सुमारास ही घटना घडली, भिंत मुलांच्या अंगावर पडली. माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले. एकूण 11 मुलं होती, त्यातील 9 मुलांचा मृत्यू, इतर 2 जखमी मुलांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत."
Madhya Pradesh | 9 children died after being buried under the debris of a wall in Sagar. Some children are injured, and they are under treatment. All the debris has been removed from the site of the incident: Deepak Arya, Collector, Sagar
— ANI (@ANI) August 4, 2024
(Source - DIPR) pic.twitter.com/saKV2RKADv
या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री मोहन यादव यांनी लिहिले की, "आज सागर जिल्ह्यातील शाहपूरमध्ये अतिवृष्टीमुळे जीर्ण घराची भिंत कोसळून 9 निष्पाप मुलांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून मला दुःख झाले. जखमी मुलांच्या उपचारासाठी योग्य व्यवस्था करण्याच्या सूचना मी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. मृत मुलांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत शासनाकडून दिली जाणार आहे.
आज सागर जिले के शाहपुर में हुई अतिवृष्टि के कारण जर्जर मकान की दीवार गिरने से 9 मासूम बच्चों के काल कवलित होने की खबर सुनकर मन व्यथित है। घायल बच्चों के उचित इलाज के लिए जिला प्रशासन को निर्देशित किया है।
— Dr Mohan Yadav (@DrMohanYadav51) August 4, 2024
भगवान से करबद्ध प्रार्थना है कि दिवंगत बच्चों की आत्मा को शांति प्रदान…
मध्य प्रदेशचे मंत्री गोविंद राजपूत म्हणाले, "प्रशासन सक्रियपणे काम करत आहे. आम्ही सर्वजण येथे उपस्थित आहोत. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपये आणि जखमींना 1 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी या संदर्भात काम करण्याच्या अशा सुचना दिल्या आहेत".












Click it and Unblock the Notifications