कलम 370 एकतेत अडथळा होता, आम्ही ते जमिनीत गाडले! काँग्रेसचे पाप धुवूनही निघणार नाही- PM मोदींची टीका
Lok Sabha Winter Session 2024 : "कलम 370 एकतेत अडथळा होता, आम्ही ते जमिनीत गाडले आहे, अजूनही काही अशा बिया आहेत ज्या देशाचे नुकसान करण्यात गुंतल्या आहेत असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. काँग्रेसच्या एका परिवाराने संविधानाला धक्का पोहचवला आहे. त्यांचा अविचार, चुकीची परंपरा आणि अविचारी परंपरा निरंतर चालत आली आहे. हे काँग्रेसचे पाप धुवून निघणार नाही अशी टीका त्यांनी केली. ते आज लोकसभेतील हिवाळी अधिवेशनात बोलत होते.
राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संसदेत विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत आहेत. तत्पुर्वी काल चर्चासत्राची सुरुवात केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केली. त्यानंतर विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी आपापली मतं मांडली. त्यानंतर आज चर्चासत्रात संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी चर्चासत्राची सुरुवात केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी येताच सभागृहात घोषणांनी दुमदुमले!
संविधानावरील विशेष चर्चासत्रात आज सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला. ते या चर्चेत सहभागी होण्यासाठी जेव्हा सभागृहात पोहोचले. त्यावेळी पंतप्रधान मोदींचे जंगी स्वागत करण्यात आले. संपूर्ण सभागृह भारत माता की जयच्या घोषणांनी दुमदुमले.
हेही वाचा : 'लोकशाही आमच्या DNAमध्ये आहे'; वाचा- गयानाच्या संसदेत PM मोदींच्या भाषणातील 5 मुद्दे
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
पंतप्रधान मोदी म्हणाले की, संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याचा हा आनंदाचा क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपल्या सर्वांसाठी, सर्व देशवासियांसाठी, जगातील लोकशाहीप्रेमी नागरिकांसाठी हा अतिशय अभिमानाचा क्षण आहे. लोकशाहीचा सण मोठ्या अभिमानाने साजरा करण्याची ही संधी आहे. संविधानाचा 75 वर्षांचा प्रवास हा एक अविस्मरणीय प्रवास आहे आणि जगातील सर्वात मोठी आणि सर्वात मोठी लोकशाही होण्याच्या या प्रवासाच्या गाभ्यामध्ये आपल्या संविधान निर्मात्यांच्या दूरदृष्टीचे योगदान आहे, ज्याच्या मदतीने आपण पुढे जात आहोत.
संविधानाची पंच्याहत्तर वर्षांची विशाल परंपरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, संविधानाचा पंच्याहत्तर वर्षांची विशाल प्रवास अविस्मरणीय आहे. जगातील सर्वात मोठ्या आणि महान लोकशाहीचा हा प्रवास आहे. याच्या मुळातः आमच्या संविधान निर्मात्यांची दिव्यदृष्टी, त्यांचे योगदान त्यांच्यामुळे आज आपण जगात पुढे जात आहोत. पंच्याहत्तर वर्ष पुर्ण होत असल्याने हा उत्सव साजरा करण्याचा क्षण आहे. माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे की, संसदही या उत्साहात सहभागी होत आहे. मी सर्व संसद सदस्यांचे आभार व्यक्त करतो.
हेही वाचा : माझ्या वडिलांच्या मृत्यूच जेवढं दुखः तेवढचं आता होतयं - राहूल, प्रियंका गांधीकडून पीडितांचं सांत्वन
नागरिकांचे अभिनंदन
पीएम मोदी म्हणाले, पंच्याहत्तर वर्षांची उपलब्धी साधारण नाही. ती असामान्य आहे. जेव्हा देश स्वतंत्र्य झाला. त्यावेळी भारताबद्दल जी शक्यता व्यक्त केली गेली त्या सर्व शक्यतांना पराभूत करुन भारताचे संविधान आपल्याला इथपर्यंत घेऊन आले. देशाच्या कोट्यवधी लोकांनी या नव्या व्यवस्थेला पुर्ण सहकार्य केले. संविधान निर्मात्याच्या भावना आणि दृष्टीकोनाला भारताचे नागरीक पुर्ण खरे उतरले म्हणून त्यांचे अभिनंदन यावेळी पंतप्रधानांनी केले.












Click it and Unblock the Notifications