Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ऐश्वर्या राय यांनी आता नव्याने केल्या मागण्या; घटस्फोटाचा कोर्टात गेलेला वाद आता आणखी क्लिष्ट

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख व बिहार सरकारचे माजी मंत्री लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप यादव यांचे त्यांच्या पत्नीशी असलेले मतभेद वाढले आहेत. त्यांची पत्नी ऐश्वर्या राय यांनी नव्याने काही मोठ्या मागण्या मांडल्या आहेत, ज्यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.

Lalu Prasad Yadav

काय आहे ऐश्वर्या राय यांची मागणी?

पटण्याच्या कौटुंबिक न्यायालयात तेजप्रताप आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. गेल्या 6 वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित आहे. नुकत्याच झालेल्या सुनावणीत, ऐश्वर्या राय यांनी नव्याने काही महत्त्वाच्या मागण्या केल्या. राबडी देवी यांच्या बंगल्याइतकं मोठं घर मिळावं. एक कार, ड्रायव्हर आणि नौकर मिळावा. दरमहा दीड लाख रुपये आर्थिक मदत मिळावी. पटण्यातील पॉश एसके पुरी भागात घर असावं, अशा मागण्यात केल्या आहेत. कोर्टाने ऐश्वर्या राय यांना एसके पुरी परिसरातील निवासस्थळ निवडून त्याची संपूर्ण माहिती देण्यास सांगितले आहे. यावर पुढील सुनावणी 18 फेब्रुवारीला होईल.

नेमका काय आहे वाद?

तेजप्रताप यादव आणि ऐश्वर्या राय यांचे लग्न 2018 मध्ये झाले होते. परंतु एका वर्षातच दोघांमध्ये तणाव निर्माण झाला. ऐश्वर्या यांनी राबडी देवी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी सांगितले की, राबडी देवी यांनी त्यांचे केस ओढले आणि घरातील गार्डने त्यांच्यावर हात उचलला. तसेच, त्यांचा मोबाईल हिसकावला गेला. त्यांच्या आई-वडिलांचा अपमान केला गेला, असा आरोप ऐश्वर्या राय हिने केला होता.

कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष

ऐश्वर्याने हा आरोप केल्यानंतर ऐश्वर्याचे वडील चंद्रिका राय यांनी पोलिसांच्या मदतीने ऐश्वर्याला घरी आणले. त्यानंतर दोघांमध्ये न्यायालयीन संघर्ष सुरू झाला. पटना उच्च न्यायालयाने फॅमिली कोर्टाला जुलै महिन्यात आदेश दिला होता की, 6 महिन्यांत हा खटला निकाली काढावा. मात्र, अद्याप निर्णय झालेला नाही. आता 18 फेब्रुवारीच्या सुनावणीत पुढील दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+