Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Lalbahadur Shashri Death Anniversary : पत्नीने विधवा पेन्शनमधून फेडले होते गाडीचे कर्ज

भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची आज पुण्यतिथी आहे. आपल्या व्यक्तीमत्त्वाने व चारित्र्यामुळे समाजावर अमीट छाप सोडणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी लाल बहादूर शास्त्री हे एक नेते होते. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कारचा व त्या कारसाठी घेतलेल्या कर्जाचा किस्सा आपण जाणून घेऊ...

Lal Bahadur Shastri

बोले तैसा चाले

लाल बहादूर शास्त्री हे बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले या उक्तीप्रमाणे चालणारे नेते होते. पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या निधनानंतर दोनच आठवड्यात लाल बहादूर शास्त्री यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. साधी राहणी व उच्च विचारसरणी ही त्यांची तत्वे होती. ती तत्वे त्यांनी आयुष्यभर सांभाळली. ते जे बोलत होते, तसेच करत होते.

शास्त्रीजींचे किस्सेही अजरामर

लाल बहादूर शास्त्रीजी यांचे किस्से अजरामर आहेत. १९६५ मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध सुरु होते. त्यावेळी देशावर अन्नधान्याचे संकट आले. अमेरिकेनेही भारतात येणारी अन्नधान्य निर्यातीवर बंदी घालण्याची धमकी दिली होती. तेव्हा लाल बहादूर शास्त्री यांनी आपल्या कुटुंबात दिवसातून एकदाच चूल पेटला. लहान मुलांना फळे व दूध खावू घाला व मोठ्यांनी उपवास करा, असा सल्ला दिला होता. कुटुंबासाठी शास्त्रीजींनी दिलेला हा सल्ला आख्ख्या देशाने ऐकला व सर्व भारतीय आठवडाभर दिवसातून एकदाच जेवले होते.

पेन्शनमधून फेडले कर्ज

११ जानेवारी १९६६ साली लाल बहादूर शास्त्री यांचा ताश्कंदमध्ये मृत्यू झाला. त्यावेळी त्यांच्या नावावर पीएनबी बँकेचे कर्ज होते. फियाट गाडी घेण्यासाठी त्यांनी हे कर्ज घेतले होते. मात्र ते फेडण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीला सरकारने पेन्शन सुरु केली. मात्र पत्नी ललिता शास्त्री यांनी या पेन्शनमधून गाडीचे कर्ज फेडले होते. शास्त्रीजींच्या कुटुंबाची ही कृती आजही चर्चीली जाते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+