kolkata doctor case: ख-या गुन्हेगांरांना तर वाचवत नाहीत ममता बॅनर्जी? हे आहेत 5 प्रश्न
kolkata doctor case : कोलकात्यामधील आरजी कर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांसह ज्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्या होत्या त्यामुळे या भयानक घटनेबाबत राज्य सरकारकडून उत्तर मिळण्याऐवजी त्यावर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होतात.
ममता बॅनर्जी या फक्त मुख्यमंत्री नाहीत. त्या पश्चिम बंगालच्या आरोग्यमंत्री असून गृहखातेही सांभाळतात. म्हणजे मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरसोबत घडलेली ही घृणास्पद घटनेबाबत त्यांची जबाबदारी आहे आणि 14-15 ऑगस्टच्या मध्यरात्री कथित 'प्रायोजित' हिंसक जमावाने हल्ला केला होता त्याचीही जबाबादारी त्यांच्यावरच येते.

ममता बॅनर्जी नेमके कोणाकडून उत्तरे मागत आहेत?
मग प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री कोणाच्या विरोधात आंदोलन करत आहेत आणि त्या कोणाकडे जाब विचारत आहेत? जर डॉक्टरच्या बलात्कार आणि निर्घृण हत्या प्रकरणाबाबत त्यांची जबाबदारी आहे.
ममता बॅनर्जी सीबीआयकडे जी मागणी करत आहेत ती कायद्याची थट्टा आहे का?
16 ऑगस्ट रोजी ममतांच्या नेतृत्वाखालील टीएमसीचे जे आंदोलन झाले त्यात मुख्यमंत्र्यांनी सीबीआयकडे केलेली मागणी देखील 14 वर्षे मुख्यमंत्री असताना आणि त्यापूर्वी केंद्रात मंत्री असण्याच्या आणि त्यांच्या समजूतदारपणावर प्रश्न निर्माण करते.
ममता बॅर्नजी म्हणाल्या की, 'रविवारपर्यंत (18 ऑगस्ट) सीबीआयला तपास पूर्ण करायचा आहे आणि दोषीला फाशी देण्यात मदत करायची आहे. आमच्या कोलकाता पोलिसांनी 90 टक्के तपास पूर्ण केला होता. प्रश्न पडतो की हे देशाच्या कोणत्या कायद्यानुसार शक्य आहे? महिला डॉक्टरांसोबत घडलेल्या या हृदयद्रावक घटनेतील दोषींना शिक्षा देण्यासाठी ममता खरंच गंभीर आहेत का?
पीडितेच्या पालकांच्या भीतीने बंगाल सरकारचा पर्दाफाश
मीडिया रिपोर्टनुसार, पीडितेच्या पालकांनी सीबीआयला सांगितले की, गेल्या काही आठवड्यांपासून त्यांची मुलगी एवढ्या दबावाखाली होती की तिला हाॅस्पिटलला जाण्याची इच्छाही नव्हती. हे सामूहिक बलात्काराचे प्रकरण असल्याचा त्यांना संशय असल्याने इतर आरोपींनाही जेरबंद करण्याची अपेक्षा आहे. मग बंगाल पोलीस तपास पूर्ण करण्याच्या जवळ होते की ते दडपण्यात व्यस्त होते?
ते हे देखील म्हटले की, या गुन्ह्यात आरोपी संजय रॉय जरी सहभागी असला तरी तो कोणाच्या तरी इशाऱ्यावर काम करत होता. पीडितेच्या आईवडिलांचे म्हणणे आहे की, रुग्णालयाने हे प्रकरण पूर्णपणे दडपण्याचा प्रयत्न केला. रुग्णालयात पोहोचल्यावर मुलीचा मृतदेह पाहण्यासाठी त्यांना तीन तास थांबवण्यात आले. प्रश्न असा आहे की हे सर्व कोणाच्या सांगण्यावरून होत होते?
बंगाल सरकारवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि ज्याप्रकारे बेकायदेशीर जमावाने मेडिकल कॉलेजवर हल्ला केला, त्यात टीएमसीच्या लोकांचाही सहभाग असल्याचा संशय आंदोलकांना आहे. पण, मुख्यमंत्र्यांनी आपल्या सरकारच्या अपयशाचे खापर विरोधी पक्षांवर फोडण्याचे टाळले नाही. वस्तुस्थिती अशी आहे की हल्ला झाला आणि तो रोखण्यात ममता सरकार अपयशी ठरले आहे.
सीबीआयच्या हाती कोणताही महत्त्वाचा पुरावा लागू नये म्हणून हे सर्व त्या सेमिनार हॉलमधून पुरावे नष्ट करण्यासाठी करण्यात आल्याचा दावा आंदोलक डॉक्टरही करत आहेत! मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही हल्लेखोर टीएमसीच्या नगरसेवकांच्या जवळचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
आत्तापर्यंत जे अहवाल समोर आले आहेत त्यावरून हे केवळ बलात्काराचे प्रकरण नाही असा दावा करण्याची अनेक कारणे आहेत किंवा त्यात एकच गुन्हेगार सहभागी आहे असे वाटत नाही. मग हे प्रकरण सीबीआयकडे सोपवल्यानंतरच ममतांनी या मुद्द्यावर राजकारण का सुरू केले?
1) डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरण दडपण्याच्या प्रयत्नामागे कोण आहे?
बंगाल सरकारने आज काही प्रश्नांची उत्तरे द्यायला हवीत. उदाहरणार्थ, पीडित ट्रेनी डाॅक्टर तरुणीचा मृतदेह अत्यंत भीषण अवस्थेत असताना तिने आत्महत्या केली म्हणणारे तत्कालीन प्राचार्य संदिफ घोष यांना वाचवण्याचा प्रयत्न का करण्यात आला? राजीनामा देऊनही त्यांना त्याच पदावर दुसऱ्या रुग्णालयात का पाठवण्यात आले? त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप देखील होत आहेत.
2) आरोपी प्राचार्यावर कारवाई का झाली नाही?
संदीप घोष यांनी पत्रकार परिषदेत पीडितेचे नाव आणि ओळख का उघड केली? मग ममतांच्या पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई का केली नाही? उलट पोलिसांना त्यांनी लगेच सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या लोकांच्या मागावार सोडले.
3) पीडितेचा मृतदेह दाखवण्यापासून कुटुंबीयांना तासनतास का रोखण्यात आले?
कुटुंबीयांना त्यांच्या एकुलत्या एक मुलीचा मृतदेह पाहण्यापासून तीन तास का रोखले गेले आणि कोणाच्या सांगण्यावरून त्यांना रोखले गेले? गुन्ह्याच्या ठिकाणी असे काय चालले होते की तुम्हाला ते उघड होण्याची भीती वाटत होती?
4) तपासादरम्यान चेस्ट विभागात दुरुस्ती का करावी लागली?
अद्याप तपास सुरू असताना चेस्ट विभागात दुरुस्तीचे काम का सुरू करण्यात आले? विशेष म्हणजे पीडित तरुणी या विभागाशी संबंधित असून तिच्यावर येथील सेमिनार हॉलमध्ये सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.
5) अटक केलेला आरोपी फक्त प्यादे आहे का?
हा सामान्य बलात्कार आणि खून प्रकरणांपेक्षा मोठे कांड आहे? हे सर्व कटाचा एक भाग म्हणून करण्यात आले असून अटक करण्यात आलेला आरोपी हा या गुन्ह्यातील केवळ एक छोटा प्यादे आहे? या घटनेमागे औषध माफियांचा हात आहे का? असे असेल तर मग या माफियांच्या डोक्यावर कोणाचा हात आहे?












Click it and Unblock the Notifications