Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'आप'चे सरकार आल्यावर सिसोदिया उपमुख्यमंत्री होणार; केजरीवालांचा नेमका डाव काय?

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी व्हिडीओ द्वारे चांगल्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन केले होते. येत्या पाच फेब्रुवारीला या निवडणुकीसाठी मतदान होणार असून, आता आम आदमी पक्षाने मोठी घोषणा केली आहे. आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन झाले तर मनिष सिसोदिया हे उपमुख्यमंत्री होतील, अशी घोषणाच अरविंद केजरीवाल यांनी करुन टाकली आहे.

Arvind Kejriwal

काँग्रेस पडली एकाकी

या निवडणुकीत इंडिया आघाडीत फूट पडली. आम आदमी पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहिर केला. दुसरीकडे काँग्रेसनेही स्वतंत्र उमेदवाऱ्या जाहीर केल्या. या दोघांमध्ये चांगली लढत पहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे इंडिया आघाडीतील इतर अनेक पक्षांनी आपला पाठींबा जाहीर केला. त्यामुळे काँग्रेस एकाकी पडल्याचे चित्र तयार झाले आहे.

भाजपला लाभ होईल?

राजकीय विश्लेषकांच्या मते, इंडिया आघाडीतील फूट भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेस व आपमध्ये लढत होत आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीतील अनेक पक्ष आपकडे वळाले आहेत. अशा परिस्थितीत अनेक मतदारसंघात काँग्रेस व आपमध्ये लढत होत असून या दोघांच्या भांडणाचा लाभ भाजपला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

केजरीवालांची आश्वासने

दिल्ली विधानसभा निवडणुका जाहिर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवाल मैदानात उतरले. त्यांनी अनेक आश्वासने देत, पुन्हा विजयी होण्याचा दावा केला आहे. पुन्हा सरकार आले तर काय-काय मोफत देणार, याची यादीत त्यांनी मतदारांसमोर ठेवली आहे. यासोबतच अरविंद केजरीवाल यांनी काल उपमुख्यमंत्रीपदाचा चेहराही जाहीर केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सिसोदिया उपमुख्यमंत्री

अरविंद केजरीवाल म्हणाले, मनिष सिसोदिया आमचे सेनापती आहेत. भलेही आमच्या दोन-चार जागा कमी येतील, मात्र सत्ता आमचीच येईल असे स्वतः दिल्लीकर आम्हाला सांगात आहेत. त्यामुळे सत्ता आली तर मी तुमच्यातलाच म्हणजेच मनिष सिसिदियांनाच उपमुख्यमंत्री करणार आहे. लोकप्रतिनीधीच जर उपमुख्यमंत्री असेल तर तुमची कामे ही फोनवर केली जातील, असा विश्वास केजरीवालांनी व्यक्त केला. सामान्यांचा उपमुख्यमंत्री करुन, केजरीवाल इमोशनल कार्ड खेळत असल्याचा काहींचा दावा आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+