Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Karur Stampede Update : अपघात की षडयंत्र?, TVK ने केली CBI चौकशीची मागणी, प्रकरण थेट हायकोर्टात!

karur stampede : तामिळनाडूतील करूर येथे अभिनेता-राजकारणी विजय यांच्या 'तमिळगा वेत्री कझगम' (टीव्हीके) पक्षाच्या रॅलीदरम्यान झालेल्या भीषण चेंगराचेंगरीने संपूर्ण राज्याला हादरवून टाकले आहे.

या दुर्दैवी घटनेत १० मुलांसह तब्बल ४० जणांचा बळी गेला, तर अनेक जण जखमी झाले. ही केवळ एक अपघाती घटना होती की यामागे काही 'षड्यंत्र' होते, यावरून आता तीव्र चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, टीव्हीकेने थेट केंद्रीय अन्वेषण विभागाची (सीबीआय) चौकशीची मागणी केली असून, हे प्रकरण मद्रास उच्च न्यायालयात पोहोचले आहे.

Karur Stampede

स्वतंत्र चौकशी करा; टीव्हीकेचा 'षड्यंत्रा'चा आरोप

टीव्हीके पक्षाने रविवारी स्पष्ट केले की, या घटनेच्या स्वतंत्र चौकशीसाठी ते मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाकडे धाव घेणार आहेत. पक्षाचा आरोप आहे की, ही चेंगराचेंगरी केवळ एक अपघात नव्हता, तर ते एका मोठ्या 'षड्यंत्रा'चा भाग होते. टीव्हीकेने त्यांच्या आरोपांची पुष्टी करताना गर्दीने केलेल्या दगडफेकीचा आणि कार्यक्रमस्थळी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा उल्लेख केला आहे.

टीव्हीकेचे वकील अरिवझगन यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार, पक्षाने मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेद्वारे, न्यायालयाने या प्रकरणाच्या तपासासाठी एक विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करावे किंवा हे प्रकरण थेट केंद्रीय एजन्सी सीबीआयकडे सोपवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

सुरक्षा उल्लंघनाचे आरोप आणि कायदेशीर लढाई

राज्य सरकारने असा दावा केला आहे की, करूर रॅलीमध्ये सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाले होते. मात्र, अरिवझगन यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. सूत्रांनुसार, मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. सेंथिलकुमार हे सोमवारी दुपारी ४:३० वाजता या प्रकरणी दाखल केलेल्या तातडीच्या याचिकेवर सुनावणी करतील. या याचिकेत, करूर चेंगराचेंगरीची चौकशी पूर्ण होईपर्यंत टीव्हीकेला कोणत्याही सार्वजनिक मेळाव्यापासून तात्पुरती बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी मांडलेली भयावह कहाणी

या अपघातातील साक्षीदारांनी घटनास्थळावरील परिस्थितीचे भयानक वर्णन केले आहे. त्यांच्या सांगण्यानुसार:

  • अंधार आणि गोंधळ

विजयच्या आगमनाच्या अगदी आधी अचानक वीज गेली. यामुळे आधीच मोठ्या असलेल्या गर्दीत गोंधळ वाढला.

  • अरुंद रस्ते आणि क्षमतेपेक्षा जास्त गर्दी

कार्यक्रमस्थळी असलेले अरुंद रस्ते आणि क्षमतेपेक्षा कैक पटीने वाढलेली गर्दी यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली.

  • गुदमरून मृत्यू

चेंगराचेंगरीत अनेक कुटुंबे एकमेकांपासून तुटली आणि अनेक महिला व मुलांचा गुदमरून मृत्यू झाला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही अनेक मृत्यू गुदमरल्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

  • विदारक दृश्य

दुसऱ्या दिवशी घटनास्थळी विखुरलेले तुटलेले बूट, फाटलेले कपडे आणि तुटलेल्या बाटल्या अपघाताची भीषणता स्पष्ट करत होत्या.

विजय यांनी जाहीर केली मदत!

या दुर्दैवी घटनेनंतर अभिनेता विजय यांनी आपले दुःख व्यक्त केले. रविवारी एका संदेशात त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 20 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 2 लाख रुपये भरपाई जाहीर केली. "हे एक मोठे नुकसान आहे. तुमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून मी या दुःखात मी तुमच्यासोबत आहे," असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री घटनास्थळी दाखल!

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनीही करूर येथे जाऊन रुग्णालयात जखमींची भेट घेतली. त्यांनी पीडितांच्या कुटुंबीयांना सर्व शक्य सरकारी मदतीचे आश्वासन दिले आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात असल्याचे सांगितले.

क्षमतेपेक्षा अडीच पट गर्दी: गलथानपणा?

पोलिस महासंचालक (डीजीपी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, टीव्हीके प्रमुख विजय यांच्या करूर रॅलीला सुमारे २७,००० लोक उपस्थित होते, तर त्या स्थळाची क्षमता केवळ 10 हजार लोकांची होती. विजय संध्याकाळी 7:40 वाजता कार्यक्रमस्थळी पोहोचले.

त्यांचे वाहन आत येताच, त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते आत आले आणि आधीच उपस्थित असलेल्या गर्दीत सामील झाले. यामुळे अचानक गर्दीचा दबाव वाढला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+