कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार; का बंद झाली होती यात्रा, भारत-चीन संबंध का बिघडले होते?
Kailash Mansarovar Yatra : भारत व चीनमधील सीमावाद सोडवण्यासाठी दोन्ही देशाकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. अशातच दोन्ही देशांच्या या प्रयत्नांना यश मिळण्यास देखील सुरुवात झालेली आहे.
चीनने हा वाद सोडवण्यासाठी एक पाऊल टाकलं असून यासंदर्भात भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने महत्त्वाची माहिती दिली आहे. कैलास मानसरोवर यात्रा पु्न्हा सुरू होणार आहे. दोन्ही देशांदरम्यान थेट हवाई सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी तत्त्वतः करार झाला असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, भारत व चीनमधील संबंध सुधारण्यासाठी, ते अधिक दृढ होण्यासाठी दोन्ही बाजूने योग्य पावलं उचलली जात आहेत. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार आहे.

जून 2020 पासून भारत-चीन संबंध बिघडले
जून 2020 मध्ये गलवानमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही दशांमधील संबंध बिघडले आहेत. डोकलाममध्ये झालेल्या संघर्षानंतर कैलास मानसरोवर यात्रा थांबवण्यात आली होती. कैलास मानसरोवर यात्रा बंद झाल्यापासून भाविक उत्तराखंडच्या व्यास खोऱ्यातून कैलास पर्वताच्या दर्शनासाठी येत होते.
मोदी अन् जिनपिंग यांच्यात झाला करार
परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात ऑक्टोबर २०२४ मध्ये रशियातील कझान येथे झालेल्या बैठकीत यावर सहमती झाली होती. दोन्ही बाजूच्या नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी भारत-चीन द्विपक्षीय संबंधांच्या स्थितीचा आढावा घेतला.
तसेच, उभय देशांचे संबंध स्थिर करण्यासाठी, पूर्ववर करण्यासाठी काही लोककेंत्रित पावलं उचलण्यावर सहमती झाली आहे. याअंतर्गत दोन्ही देशांनी 2025 च्या उन्हाळ्यात कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत आणि चीन यांच्यातील बैठकीसाठी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री हे २६ आणि २७ जानेवारी रोजी बीजिंग दौऱ्यावर गेले होते. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी या दोघांमध्ये उभय देशांचे संबंध सुधारण्यावर बरीच चर्चा झाली. यावेळी दोन्ही बाजूंनी कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वांग यी यांनी बीजिंगमध्ये विक्रम मिस्री यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान चीन - भारत संबंध सुधारण्याच्या प्रक्रियेला गती मिळण्यावर भर दिला असल्याचं सांगितलं.
थेट विमानसेवाही सुरू होणार
सीमापार नद्यांशी संबंधित इतर सहकार्यावर चर्चा करण्यासाठी भारत-चीन तज्ज्ञ स्तरावरील बैठक घेण्याचेही मिस्री व वांग पी यांनी मान्य केले आहे. ब्रह्मपुत्रा नदीवर चीनने बांधलेल्या धरणाबाबत भारताने या बैठकीत आपली चिंता व्यक्त केली. तसेच उभय देशांमधील थेट हवाई सेवा पुन्हा सुरू करण्यावर तत्त्वतः सहमती झाली आहे.
कोरोनापूर्वी दरमहा ५३९ थेट उड्डाणे होत होती
कोरोना साथीपूर्वी दोन्ही देशांमध्ये दरमहा ५३९ थेट उड्डाणे होत असत. त्यांची एकूण क्षमता १.२५ लाखांपेक्षा जास्त जागांची होती. या उड्डाणांमध्ये एअर इंडिया, चायना सदर्न एअरलाइन्स, चायना ईस्टर्न एअरलाइन्स सारख्या कंपन्यांचा समावेश होता. विमान सेवा बंद असल्याने, दोन्ही देशांतील प्रवासी बांगलादेश, हाँगकाँग, थायलंड आणि सिंगापूर सारख्या कनेक्टिंग हबमधून प्रवास करत होते. तथापि, हा प्रवास महागडा होता.
हवाई वाहतूक माहिती देणारी कंपनी सिरियमच्या मते, जानेवारी ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान भारत आणि चीन दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या ४.६ लाख होती. तर, २०१९ च्या पहिल्या १० महिन्यांत हा आकडा १० लाख होता. जानेवारी ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान, १.७३ लाख लोकांनी हाँगकाँग मार्गे, ९८ हजारांनी सिंगापूर मार्गे, ९३ हजारांनी थायलंड मार्गे आणि ३० हजार लोकांनी बांगलादेश मार्गे दोन्ही देशांमध्ये प्रवास केला.
कैलाश मानसरोवरचा बहुतांश भाग तिबेटमध्ये
कैलाश मानसरोवरचा बहुतांश भाग तिबेटमध्ये आहे, चीन तिबेटवर आपला हक्क सांगतो. कैलास पर्वतरांगा काश्मीरपासून भूतानपर्यंत पसरलेली आहे. या भागात ल्हा चू आणि झोंग चू नावाच्या दोन ठिकाणांमध्ये एक पर्वत आहे. या पर्वताला येथे दोन जोडलेली शिखरे आहेत. यापैकी उत्तरेकडील शिखर कैलास म्हणून ओळखला जातो.
या शिखराचा आकार एका विशाल शिवलिंगासारखा आहे. हे ठिकाण उत्तराखंडमधील लिपुलेखपासून फक्त 65 किलोमीटर अंतरावर आहे. सध्या कैलाश मानसरोवरचा एक मोठा भाग चीनच्या ताब्यात आहे. त्यामुळे येथे जाण्यासाठी चीनची परवानगी आवश्यक आहे.
श्रद्धा - भगवान शिव कैलास पर्वतावर राहतात.
हिंदू धर्मात असे मानले जाते की भगवान शिव त्यांच्या पत्नी पार्वतीसह कैलास पर्वतावर राहतात. म्हणूनच हे हिंदूंसाठी एक अतिशय पवित्र स्थान आहे. जैन धर्मात असे मानले जाते की पहिले तीर्थंकर ऋषभनाथ यांना येथून मोक्ष मिळाला होता. २०२० पूर्वी, दरवर्षी सुमारे ५० हजार हिंदू भारत आणि नेपाळ मार्गे धार्मिक तीर्थयात्रेसाठी येथे येत असत.
२०२० पासून चीन भारतीयांना कैलास मानसरोवरला जाण्याची परवानगी देत नाही. या महिन्यात, भारत सरकारने एका माहिती अधिकाराच्या उत्तरात म्हटले आहे की, लोकांना कैलास मानसरोवरला जाण्यापासून रोखून, चीन २०१३ आणि २०१४ मध्ये केलेल्या दोन प्रमुख करारांचे उल्लंघन करत आहे.
-
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
Epfo pension : 20 दिवस उलटूनही पेन्शन क्लेम होतोय रिजेक्ट? ही आहेत कारणे; वाचा ईपीएफओचा नवा नियम -
LPG Cylinder New Rule: गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये बदल; ग्रामीण भागात आता 'इतक्या' दिवसांनी होणार बुकिंग -
Gold Price Forecast: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! 1 तोळा सोनं 2 लाखांचा टप्पा ओलांडणार? वाचा अंदाज -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस -
मनोरंजन विश्वावर शोककळा! अवघ्या 27व्या वर्षी प्रसिद्ध कलाकाराचा संशयास्पद मृत्यू -
PM Kisan 22nd Installment आज कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2 हजार रुपये; वेळ आणि स्टेटस तपासा -
Horoscope Today March 12, 2026 Marathi : गुरुवार ठरणार प्रगतीचा दिवस; वाचा तुमच्या राशीत काय आहे खास -
IPL 2026 Schedule: आयपीएलचे 15 दिवसांचे वेळापत्रक समजून घ्या; पहिल्या सामना RCB Vs हैदराबाद










Click it and Unblock the Notifications