उद्या झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यात 38 जागांवर मतदान, नंतर सायंकाळी एक्झिटपोलवर सर्वांचे लक्ष!
Jharkhand Election 2024 : झारखंड विधानसभा निवडणुकीचा दुसऱ्या टप्प्यातील प्रचार 18 नोव्हेंबरला संपला, त्यानंतर आता उद्या 20 नोव्हेंदुसऱ्या टप्प्यात उद्या मतदान
बरला 38 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने झारखंडमध्ये निवडणुकींची घोषणा केल्यानंतर जोरदार प्रचार सुरु होता. झारखंडमध्ये पहिला टप्प्यात 13 नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या 43 जागांसाठी मतदान प्रक्रीया पार पडली. 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार असून निवडणुकीच्या धर्तीवर सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

झारखंड निवडणुकीचा दुसरा आणि अंतिम टप्पा 20 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. एकूण 81 जागांपैकी उर्वरित 38 जागांसाठी मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक विभाग आणि पोलिस दलही सज्ज झाले आहे.
सकाळी 7 पासून मतदानाला सुरुवात
बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. मात्र, 31 बूथमध्ये मतदानाची वेळ दुपारी 4 वाजता संपणार असली तरी त्या वेळी रांगेत उभ्या असलेल्या लोकांना मतदान करता येणार आहे.
मतदानानंतर झारखंडमधील एक्झिट पोलच्या अंदाजांवर सर्वांचे लक्ष
मतदानानंतर झारखंडमधील एक्झिट पोलच्या अंदाजांवर सर्वांचे लक्ष असेल जे राज्यात पुढील सरकार कोण बनवू शकते याचे संकेत देईल. एक्झिट पोलचे अंदाज महाराष्ट्रातही मतदान संपल्यानंतर लगेचच संध्याकाळी 6 वाजेनंतर पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. झारखंड विधानसभेच्या एकूण 81 जागांसाठी मतदान उद्या पूर्ण होईल. या जागा आपल्या पदरात पाडण्यासाठी अर्थातच विजय संपादन करण्यासाठी सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी तयारी केली आहे. यावेळी इंडिया आघाडी आणि एनडीए यांच्यात चुरशीची लढत आहे.
मागच्यावेळी झाल्या होत्या 5 टप्प्यात निवडणुका
झारखंड विधानसभा निवडणुका 2019 मध्ये 30 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या पाच टप्प्यांत झाल्या होत्या आणि 23 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात आला होता. त्या निवडणुकीत महाआघाडीचा विजय झाल्यानंतर हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ते सध्या तेथील मुख्यमंत्री आहेत.
काय होते 2019 च्या निवडणुकीचे निकाल?
- 2019 मध्ये झारखंडमध्ये JMM-CONG-RJD युतीचे सरकार स्थापन झाले.
- हेमंत सोरेन यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली.
- 2019 च्या निवडणुकीच्या निकालांमध्ये JMM ला 30 जागा मिळाल्या.
- याच निवडणुकीत काँग्रेसला 16, आरजेडीने 1 आणि भाजपने 25 जागा जिंकल्या होत्या.
- 2014 मध्ये 37 वरून खाली आली. JMM-काँग्रेस-RJD युतीने 47 जागांसह आरामदायी बहुमत मिळवले.












Click it and Unblock the Notifications