जागावाटप योग्य झालंय, झारखंड आम्हीच जिंकणार; भाजप नेते प्रतुल शहा देव यांनी व्यक्त केला विश्वास
महाराष्ट्राची निवडणूक जाहीर झाली त्याच दिवशी झारखंडची निवडणूकही जाहीर करण्यात आली. झारखंडमध्ये १३ आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्पयात मतदान घेण्यात येणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. झारखंड निवडणुकीसाठी एनडीए आघाडीचे जागावाटप झाले आहे. यंदा झारखंडमध्ये भाजपसह ऑल झारखंड स्टुडंट युनिअन, जनता दल आणि लोक जनशक्ती पार्टी हे चार पक्ष एकत्र निवडणूक लढवत आहेत.
एनडीचे जागावाटप झाले
झारखंडमध्ये इतिहासात प्रथमच भाजप इतर तिन पक्षांसोबत युती करुन निवडणुकीला सामोरे जात आहे. भाजप, ऑल झारखंड स्टुडंट यूनियन (एजेएसयू), जनता दल (युनायटेड) आणि लोक जनशक्ती पार्टी (एलजेपी) हे एकत्रित निवडणूक लढवत आहेत. या चारही पक्षांचे जागावाटप झाले आहे. त्यानुसार ६८ जागांवर, एजेएसयू १० जागांवर, जेडीयू २ जागांवर तर एलजेपी चत्राची या एकमेव जागेवर निवडणूक लढविणार आहे.

चौहान यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास
जागावाटपानंतर केंद्रीय मंत्री व झारखंड भाजपचे निवडणूक प्रभारी शिवराज चौहान यांनी माध्यमांना प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, एनडीएचे झालेले जागावाटप हे समाधानकारक आहेत. सर्वजण एकत्र मिळून ही निवडणूक लढविणार आहोत. इंडी आघाडीच्या झारखंड मुक्ती मोर्चा व काँग्रेसला पराभूत केल्यावरच, आपण सुटकेचा निःश्वास सोडू. आमचे जागावाटप झाले. आता लवकरच उमेदवाराचीही घोषणा होईल. आम्ही झारखंडमध्ये नक्की सरकार स्थापन करु, असा विश्वासही चौहान यांनी व्यक्त केला.












Click it and Unblock the Notifications