PSLV-C61 राॅकेट भटकले! इस्त्रोची 101 वी मोहिम अयशस्वी का झाली? 3 मुद्द्यात समजून घ्या कारण
Isro pslv c61 launch from sriharikota mission eos 09 failure : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून PSLV-C61 रॉकेटचे प्रक्षेपण केले. परंतु, काही तांत्रिक बिघाडामुळे रॉकेट भटकले, त्यामुळे ही मोहिम थांबवावी लागली, खुद्द इस्त्रोनेच यासंदर्भात माहिती दिली आहे. या मोहिमेचा उद्देश EOS-09 (पृथ्वी निरीक्षण उपग्रह) अवकाशात ठेवणे हा होता.
EOS-09 हा उपग्रह विशेषतः हवामान, सीमा सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि कृषी, देखरेखीत मदत करणार होता.त्यासाठीच त्याचे डिझाईन करण्यात आले होते.

पीएसएलव्ही (ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन) हे इस्रोचे सर्वात विश्वासार्ह रॉकेट आहे, ज्याने 50 हून अधिक यशस्वी प्रक्षेपणे केली आहेत. पण PSLV-C61 मोहिमेने या प्रतिष्ठेला धक्का दिला.
Today 101st launch was attempted, PSLV-C61 performance was normal till 2nd stage. Due to an observation in 3rd stage, the mission could not be accomplished.
— ISRO (@isro) May 18, 2025
इस्त्रोचे ट्विट
1. कसे भटकले पीएसएलव्ही राॅकेट?
प्रक्षेपणानंतर सुमारे 203 सेकंदांनी, जेव्हा तिसरा टप्पा (PS3) सक्रिय झाला, तेव्हा योग्य वेळी आणि वेगाने थ्रस्ट निर्माण झाला नाही. यामुळे रॉकेटचा मार्ग विचलित झाला आणि EOS-09 उपग्रह निर्धारीत केलेल्या कक्षेत पोहोचू शकला नाही.
2. नेमकी का अयशस्वी झाले प्रक्षेपण
वनइंडिया हिंदीच्या वृत्तानुसार, 18 मे, रविवारी सकाळी 5:59 वाजता इस्रोने श्रीहरिकोटा येथून PSLV-C61 रॉकेट प्रक्षेपित केले. त्याचा उद्देश हवामान, सीमा सुरक्षा आणि आपत्ती माहिती उपग्रह EOS-09 ला 524 किमी उंचीवर असलेल्या SSPO (सन सिंक्रोनस पोलर ऑर्बिट) कक्षामध्ये पोहोचवणे हा होता. पण तिसऱ्या टप्प्यात, म्हणजे PS3 मध्ये, काहीतरी तांत्रिक बिघाड झाला. हा टप्पा रॉकेटच्या उड्डाणानंतर सुमारे 203 सेकंदांनी सक्रिय होतो आणि उपग्रहाला योग्य मार्गावर
3. येथे झाली चूक?
इस्रोच्या सुरुवातीच्या माहितीवरून असे दिसून आले की तिसऱ्या टप्प्यातील मोटर योग्यरित्या काम करत नव्हती. याचा अर्थ असा की त्या भागात वापरलेले इंधन (HTPB) एकतर योग्यरित्या जळले नाही किंवा त्या भागाच्या डिझाइनमध्ये काही दोष होता. परिणामी रॉकेट मार्गावरून फिरले आणि इस्रोला ते नष्ट करावे लागले.
EOS-09 उपग्रह हवामान, सुरक्षेसाठी होता खास
- EOS-09 उपग्रहाचे वजन अंदाजे 1,696 किलो होते आणि सी-बँड सिंथेटिक अपर्चर रडार (SAR) वापरून सर्व हवामान परिस्थितीत स्पष्ट प्रतिमा पाठवण्याचा त्याचा हेतू होता.
- भारतीय लष्कर, आपत्ती व्यवस्थापन आणि पर्यावरणीय देखरेखीसाठी हा उपग्रह खूप महत्त्वाचा होता.
Credit - Oneindia Hindi
हेही वाचा : इस्रोने पुन्हा एकदा इतिहास घडवला! SSLV चे यशस्वी प्रक्षेपण, जाणून घ्या का खास आहे मिशन












Click it and Unblock the Notifications