टाटा कुटुंब होते भारतीय उद्योगाचे जनक; या कुटुंबाबद्दल तुम्हाला माहिती आहे का..? वाचा संपूर्ण माहित

Ratan Tata Family : रतन टाटा यांचे बुधवारी रात्री उशीरा, बीच कॅन्डी रुग्णालयात निधन झाले. आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर त्यांनी टाटा समुहाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. टाटा समुहाचा कायापालट केला होता. टाटा समुहामुळे भारतीय अर्थव्यवस्था बऱ्याच अंशी सुधारली असेही म्हटले जाते. भारताला औद्योगिक क्षेत्रात नवी ओळख निर्माण करुन देणार्‍या टाटा समुहाबद्दल अनेकांना माहिती नाही. टाटा घराण्याचे संस्थापक नुसेरवानजी टाटा यांनी औद्यागिक क्षेत्राचा पाया घातला.

जमशेदजी टाटांनी केली पायाभरणी

भारतीय उद्योगाचे जनक म्हणून ओळखले जाणारे जमशेदजी टाटा यांचा जन्म 1839 साली झाला. त्यांचे वडील नुसेरवानजी टाटा यांना जमशेदजी टाटा हा एक मुलगा व रतनबाई टाटा, मानेकबाई टाटा, वीरबाईजी टाटा आणि जेरबाई टाटा या चार मुली होत्या. 1870 साली मध्य भारतातील कापड व्यवसायातून औद्योगिक क्षेत्रात पहिले पाऊ टाकले. त्यानंतर पोलाद आणि उर्जा उद्योगात शिरकाव केला. तांत्रिक शिक्षण संस्था स्थापन करण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा होता. जमशेदजींनी हिराबाई दाबू यांच्याशी लग्न केल्यानंतर त्यांना सर दोराबजी टाटा, सर रतन टाटा ही दोन मुले व धुनबाई टाटा ही मुलगी झाली.

Ratan Tata Family

जमशेदजींची दुसरी पिढीची कर्तृत्ववान

जमशेदजी टाटांचा मोठा मुलगा सर दोराबजी टाटा यांनी टाटा समूहाच्या वाढीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. दोराबजींना मूलबाळ नव्हते आणि त्यांनी कुटुंबाचा व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांचे बरेच आयुष्य समर्पित केले. सर रतन टाटा हे जमशेटजींचे धाकटा सुपुत्र होते. त्यांनीही कौटुंबिक व्यवसायाला चार चाँद लावले. सर रतन टाटा यांच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी नवाजबाईंनी नवल टाटा यांना दत्तक घेतले.

रतन टाटा यांचे वडिल होते दत्तकपूत्र

नवल टाटा हे सर रतन टाटा आणि नवजबाई सेट यांचे दत्तक पुत्र. त्यांना रतन टाटा आणि जिमी टाटा ही दोन मुले झाली. रतन टाटा अवघ्या 10 वर्षांचे असताना त्यांच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला. रतन टाटा 18 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांना दुसरे लग्न केले. दुसऱ्या लग्नानंतर नवल टाटा यांना नोएल टाटा हा पुत्र झाला. म्हणजेच नवल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ होते. रतन टाटा हे त्यांचा लहान भाऊ जिमी टाटा आणि सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्यासोबत लहानाचे मोठे झाले. त्यांच्या आजीने त्यांचा संभाळ केला. मुंबईतील टाटा पॅलेसमध्येच ते लहानाचे मोठे झाले.

रतन टाटांकडे होती दुरदृष्टी

रतन टाटा यांचा जन्म 1937 सालचा. टाटा समूहासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले. 1991 पासून ते टाटा समुहाचे अध्यक्ष बनले. 2012 मध्ये त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सुमारे 21 वर्षे त्यांनी या समुहाला एका वेगळ्या उंचीवर नेले. जग्वार लँड रोव्हर सारख्या मोठ्या विदेशी कंपन्या विकत घेत टाटा समुहाने जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला. त्यांनी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून भारतभर विविध सामाजिक आणि धर्मादाय प्रकल्पांवर काम केले.

रतन टाटा व त्यांचा धाकटा भाऊ जिमी टाटा हे दोघेही प्रसिद्धीपासून कायम लांबच राहिले. रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा हे सध्या टाटा समूहातील महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत. ते टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि टाटा इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. तेच यापुढे टाटा समुहाची जबाबदारी घेतील, असेही काहींचे म्हणणे आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+