Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी! पाकिस्तानने डागले क्षेपणास्त्रं! भारतीय वायूदलाच्या यंत्रणेने केले निष्क्रिय

India Pakistan War : भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानने पोसलेल्या दहशतवाद्यांची 9 प्रशिक्षण तळं नष्ट केली. यानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताला रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ असा इशारा दिला आहे. या घडामोडीदरम्यानच एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानने आज पहाटे दिडच्या सुमारास क्षेपणास्त्रे डागले पण वीर भारतीय वायू दलाच्या संरक्षण यंत्रणेने हे निकामी केले आहे.

India Pakistan War

रिपोर्टनुसार, भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने गुरुवारी पहाटे पाकिस्तानकडून डागण्यात आलेल्या अनेक प्रक्षेपणास्त्रांना रोखले आणि निष्क्रिय केले. ही घटना पहाटे 1:10 ते 1:2o दरम्यानची आहे. पाकिस्तानची क्षेपणास्त्रं रोखल्यानंतर पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठे स्फोट झाले असून या अडवण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांचे अवशेष सापडल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे पंजाबच्या काही भागात काही काळासाठी वीजपुरवठा बंद झाला पण नंतर पहाटे पावने पाचवाजता तो सुरळीत झाला.

पाकिस्तान त्यांच्या करारनाम्याला आता अधिकच चालना देत आहे. भारतीय वायूदलाने पाकिस्तानच्या नागरी वसाहतींना धोका होणार नाही याची दक्षता घेत 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूरद्वारे एअरस्ट्राईक केली. ही कारवाई पाकिस्तान सरकारला चांगलीच झोंबल्याचे या घटनेवरुन दिसून आले आहे.

भारताची सक्षमता आली दिसून

भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानच्या क्षेपणास्त्र माऱ्यांना तत्काळ आणि चोख प्रत्युत्तर दिले. ज्यामुळे संभाव्य हाणी टळली. यात भारताची संपर्क यंत्रणा आणि वायूदल किती दक्ष आहे याचाच प्रत्यय यानिमित्ताने आपल्या शत्रूराष्ट्राला आला आहे. या प्रतिसादाचे वर्णन क्लिनिकल आणि नियंत्रित असे करण्यात आले आहे, पश्चिम सीमेवरील उच्च तयारी दर्शवते.

कोणतीही जीवीतहाणी नाही

रिपब्लिक न्यूजने दिलेल्या वृ्त्तानुसार, पाकने क्षेपणास्त्र डागल्यानंतर कोणतीही नागरी जीवितहानी किंवा पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. अधिकारी प्रक्षेपणांच्या उत्पत्ती आणि स्वरूपाचा पुढील तपास करत असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

गुरुद्वाराजवळ एक तोफगोळा पडला, ज्यामुळे त्याच्या बाह्य रचनेचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. गुरुद्वाराच्या भिंतींवर गोळीबाराच्या खुणा स्पष्टपणे दिसत होत्या, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

संशयास्पद ड्रोन स्फोट

भारत-पाकिस्तान सीमेजवळ, गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील खावडा भागात हाय-टेन्शन पॉवर लाईनशी आदळल्यानंतर एक संशयास्पद ड्रोन स्फोट झाला. बुधवारी रात्री उशिरा झालेल्या या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु त्यामुळे मोठा सुरक्षा इशारा देण्यात आला आहे.

पाकिस्तानच्या लष्करी हालचाली वाढल्या

ऑपरेशन सिंदूरच्या एक दिवसानंतर, पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ शहरातील धार्मिक स्थळांना लक्ष्य करून विनाकारण तोफगोळ्यांचा मारा केला. त्यानंतर फायरिंगही केली होती. दरम्यान, आता पाकिस्तानच्या लष्करी हालचाली वाढल्या असून गोळीबारासारख्या घटना आणि ड्रोनची घुसखोरी, सायबर हल्ले आणि सीमेलगत सुरु असलेल्या दहशतवादी हालचालीमुळे गुप्तचर संस्था अतिदक्षता बाळगून आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+