पाकड्यांच्या 4 एअरबेसवर भारताचा निशाणा; 6 बॅलिस्टिक मिसाईल डागली, भारतीय सैन्याकडून जशास तसे उत्तर!
India fired 6 ballistic missiles, claims by Pakistan : पाकिस्तानने शुक्रवारी संध्याकाळपासून भारतातील 26 शहरांमध्ये ड्रोन हल्ले सुरू केले. जे भारतीय संरक्षण यंत्रणेने हाणून पाडले. भारताने सहा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागल्याचा आरोप पाकिस्तानकडून केला आहे. ज्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढीस लागला आहे. दोन्ही देशांचे सैनिक आता डोळ्यात तेल घालून देशाच्या रक्षणासाठी सज्ज झालेले आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत विरुद्ध पाकिस्तानात तणाव
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे. गुरुवारनंतर, शुक्रवारी उशिरा संध्याकाळपासून, पाकिस्तानने भारतातील 26 शहरांमधील लोकसंख्या असलेल्या भागात ड्रोन हल्ले सातत्याने केले. जे भारतीय संरक्षण यंत्रणेने पूर्णपणे हाणून पाडले.
दरम्यान, पाकिस्तानी लष्कराने दावा केला आहे की भारताने सहा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. पाकिस्तानने याला भारताचे बेजबाबदार कृत्य म्हटले आहे. त्यानंतर पाकिस्तानने एअरबेस बंद केला आणि NOTAM जारी केला. तथापि, भारत सरकारने अद्याप या हल्ल्याबाबत कोणतीही पुष्टी केलेली नाही. भारतीय क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानच्या रावळपिंडी, मुरीद चक्रवाल, सोरकोट आणि नूरखान या चार हवाई तळांना लक्ष्य केले आहे. हे हवाई तळ उद्ध्वस्त झाले आहेत.

पाकिस्तानी सैन्याने काय म्हटले?
पाकिस्तानी लष्कराच्या जनसंपर्क विभागाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, भारताकडून सहा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. भारताने जालंधरमधील आदमपूर एअरबेसवरून ही क्षेपणास्त्रे डागली. जनरल अहमद यांनी भारताच्या या कारवाईला विरोध केला आहे आणि ते बेजबाबदार आणि अत्यंत धोकादायक असल्याचे म्हटले आहे. जर भारताचा हा आक्रमक पवित्रा असाच चालू राहिला तर परिस्थिती अधिक तणावग्रस्त होत राहिल, असेही ते म्हणाले.
हे ही वाचा : बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे म्हणजे काय? भारत-पाकिस्तान तणावादरम्यान त्यांची ताकद समजून घ्या
पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद केले
भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे. रावळपिंडी आणि रफीकी हवाई तळांवर झालेल्या स्फोटांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
हे ही वाचा : शेपूट वाकडी ती वाकडीच! पाकिस्तानकडून पुन्हा उरी, पूंछ भागात गोळीबार; जैसलमेरसह या भागात ब्लॅकआउट!
पाकिस्तानी हवाई तळावर स्फोट
भारताने चार हवाई तळांवर हल्ला केल्याचा आरोप पाकिस्तानने केला. रावळपिंडी, इस्लामाबाद आणि लाहोरमध्ये अनेक मोठे स्फोट झाल्याचे वृत्त देखील समोर आले.
ज्यांचे पडसाद दूरवर जाणवले, त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि ते घराबाहेर पडले. पाकिस्तानातील रावळपिंडी येथील नूर खान एअरबेसजवळ स्फोट झाला आहे. पंजाब प्रांतातील झंग, शोरकोट येथील रफीकी एअरबेसजवळ स्फोट झाला. चकवालमधील मुरीद बेसजवळही स्फोट झाल्याची माहिती समोर आलेली आहे.












Click it and Unblock the Notifications