Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शेपूट वाकडी ती वाकडीच! पाकिस्तानकडून पुन्हा उरी, पूंछ भागात गोळीबार; जैसलमेरसह या भागात ब्लॅकआउट!

India Vs Pak War : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची परिस्थिती कायम आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने जो एअर स्ट्राईक केला त्यात पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उडवले. दुसरीकडे, गुरुवारी रात्री पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला परंतु, भारतीय सैन्यदलाने ते हल्ले परतवून लावले. अशातच, असे म्हटले जाते की, कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडी, अगदी तशीच परिस्थिती शेजारच्या देशाची झाल्याचे पाहायला मिळत आहे.

फिरोजपूर येथे क्षेपणास्त्र हल्ला, भारताने उधळून लावला..!

पाकिस्तानने सलग दुसऱ्या दिवशी भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. शुक्रवारी संध्याकाळ होताच पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील उरी, तंगधार, केरन, मेंढर, नौगाम, आरएस पुरा, अर्निया आणि पूंछ या सहा सेक्टरमध्ये गोळीबार सुरू केला. तसेच पंजाबमधील अमृतसरमधील फिरोजपूर येथे रात्री 8:30 वाजता क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. ते उधळून लावण्यात आले. दुसरीकडे, राजस्थानमधील पोखरण आणि जम्मूमधील सांबा येथेही ड्रोन हल्ले करण्यात आले.

India Pakistan war situation

संध्याकाळ होत नाही तोच पुन्हा गोळीबार!

शुक्रवारी संध्याकाळ होताच पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील उरी, तंगधार, केरन, मेंढर, नौगाम आणि पूंछ या सहा सेक्टरमध्ये गोळीबार सुरू केला. त्याच वेळी, चंदीगड आणि अंबाला येथे हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

लष्कराचे पश्चिम कमांड चंदीगडमध्ये आहे; एनआयए कार्यालयही तिथेच आहे. अंबाला येथे एक हवाई दलाचे तळ आहे. त्यामुळे भारतीय सैन्य आता दक्ष झालेले असून ते कोणताही हल्ला परतवून लावण्यास सक्षम झालेले आहे.

भारत-पाकिस्तान तणावाशी संबंधित अपडेट्स

  • केंद्र सरकारने एक अधिसूचना जारी केली आहे. असे म्हटले जाते की जर लष्करप्रमुखांना हवे असेल तर ते प्रादेशिक सैन्याच्या (टीए) अधिकाऱ्यांना आणि सैनिकांना बोलावू शकतात. टीए ही एक निमलष्करी दल आहे जी गरज पडल्यास सैन्याला मदत करते.
  • गृह मंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत.
  • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी, एअर चीफ मार्शल एपी सिंग आणि सीडीएस अनिल चौहान यांनी ताज्या परिस्थितीची माहिती दिली.

  • गृहमंत्र्यांनी बीएसएफ आणि सीआयएसएफ अधिकाऱ्यांसोबतही बैठक घेतली. त्यांनी भारत-पाकिस्तान सीमा आणि विमानतळांच्या सुरक्षेची माहिती घेतली. कृषी मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयानेही तयारीबाबत बैठक घेतली.
  • गेल्या 3 दिवसांपासून पाकिस्तानी सैन्य नियंत्रण रेषेवर (एलओसी) सतत गोळीबार करत आहे. यामध्ये 17 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 5 मुलांचाही समावेश आहे. अनेक इमारती आणि वाहनांचेही नुकसान झाले आहे.

पंतप्रधान मोदींनी तिन्ही सशस्त्र दलांच्या माजी प्रमुखांची भेट घेतली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सशस्त्र दलातील माजी सैनिकांच्या गटाची भेट घेतली, ज्यात माजी हवाई दल प्रमुख, लष्कर प्रमुख, नौदल प्रमुख तसेच संरक्षण मंत्री आणि सीडीएस यांचा समावेश होता.

या बैठकीत ऑपरेशन सिंदूरची प्रगती, सीमा तणाव आणि भविष्यातील रणनीती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीचा भर लष्करी तयारी, गुप्तचर यंत्रणा मजबूत करणे आणि जलद प्रत्युत्तर यावर असल्याचे सांगितले जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+