पाकचे 50 ड्रोन हल्ले केले निष्क्रिय! पाकिस्तानच्या 'या' शहरांवर भारताचा प्रहार! रात्रीत काय घडलं?
India Pakistan War 50 Pak drone attacks neutralized India : पाकिस्तानने हमास स्टाईल हल्ले केल्यानंतर त्याला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानने काल रात्रीतून जवळपास 50 ड्रोन हल्ले केले. यातील एकाही हल्ल्यात भारताचे काहीही नुकसान झाले नाही. पाकिस्तान भारताच्या केसालाही धक्का लावू शकलेला नाही. उलट आरंभ हैं प्रचंड..नुसार भारताने पाकिस्तानच्या घरात घूसून त्यांची यंत्रणा नष्ट केली.

एनआयने संरक्षण सूत्रांच्या हवाल्यानुसार वृत्त दिले. काल रात्री, नियंत्रण रेषा (LoC) आणि आंतरराष्ट्रीय सीमा (IB) वर विविध ठिकाणी पाकिस्तानने झुंड ड्रोन पाठवण्याचे अयशस्वी प्रयत्न केले. तेव्हा उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नगरोटा आणि पठाणकोट भागात भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण युनिट्सने मोठ्या प्रमाणात काउंटर-ड्रोन ऑपरेशन केले. या कारवाईत L-70 तोफा, Zu-23mm, Schilka प्रणाली आणि इतर प्रगत काउंटर-UAS उपकरणांचा व्यापक वापर करण्यात आला, ज्यामुळे हवाई धोक्यांचा सामना करण्यासाठी सैन्याची मजबूत क्षमता दिसून आली असे या वृत्तात म्हटले आहे.
Yesterday night, when Pakistan made failed attempts to send swarm drones all across various places along the Line of Control (LoC) and International Borders (IB), over 50 drones were successfully neutralized during a large-scale counter-drone operation conducted by Indian Army… pic.twitter.com/x2pJE16940
— ANI (@ANI) May 9, 2025
भारतीय लष्कराने म्हटले आहे की, "पाकिस्तानी सशस्त्र दलांनी 8 आणि 9 मे 2025 च्या मध्यरात्री संपूर्ण पश्चिम सीमेवर ड्रोन आणि इतर शस्त्रसामग्रीचा वापर करून अनेक हल्ले केले. जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने अनेक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. ड्रोन हल्ले प्रभावीपणे परतवून लावण्यात आले आणि सीएफव्हींना योग्य उत्तर देण्यात आले."
#WATCH | Amritsar, Punjab: Security heightened outside Shri Guru Ram Das Ji International Airport.
— ANI (@ANI) May 9, 2025
The entire functions of the airport are shut until further notice. pic.twitter.com/OeTK32IErb
पाकिस्तानचे 'या' अकरा शहरावर हल्ले अयशस्वी
जम्मू, आरएस, पुरा, सांबा, अर्निया, अखनूर, तंगधार, केरन, कर्णह, पठाणकोट, पोखरण, जैसलमेर, या सर्व क्षेत्रांमध्ये पाकने हल्ले करण्याचा प्रयत्न केला पण ब्लॅकआउट करून भारतातर्फे जलद लष्करी कारवाई करण्यात आली.
भारताचा प्रत्युत्तरात या शहरावर हल्ले!
पाकिस्तानने भारतावर हल्ल्यावर हल्ले सुरु केले पण त्याचा बिमोड भारतीय लष्कराने केला. एका रात्रीतच भारताने पाकिस्तानला आपले लष्करी सामर्थ्य दाखवले. भारताने लाहोरजवळील पाकिस्तानी हवाई तळांवर प्रत्युत्तर हल्ला केला. पीओकेमध्ये 3 दहशतवादी लाँच पॅड नष्ट केले, यासह लाहोरची हवाई संरक्षण यंत्रणा देखील नष्ट झाली.
कराची बंदरावर हल्ला
भारतीय नौसेनेनेही पाकिस्तानच्या कराची बंदराला नेस्तनाबूत केले. जेथुन हल्ला करणार आणि ज्या यंत्रणेचा वापर करणार त्यावरच भारताने थेट हल्ला चढवला. भारतीय विक्रांतने पाकिस्तानला लष्करी सामर्थ्य दाखवत सागरी क्षेत्रातही आपले वर्चस्व असल्याचे यामुळे सिद्ध झाले आहे. आता भारताचे पुढचे टार्गेट रावळपिंडी असल्याचेही वनइंडिया हिंदीच्या वृत्तात म्हटले आहे.
-
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस












Click it and Unblock the Notifications