भारताची स्वःतची विकासयात्रा जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनत आहे - आशिष चौहान
Ashish Chauhan's opinion : भारत आर्थिक विकासाच्या आणि जागतिक प्रभावाच्या नवीन युगात झेप घेण्याच्या तयारीत आहे. त्याचवेळी इंडिया ग्लोबल फोरमच्या 'NXT25' शिखर परिषदेत भारताची विकसित गुंतवणूक परिदृष्य वित्तीय बाजार सुधारणा आणि धोरणात्मक भागीदारी आगामी 25 वर्षांच्या संपत्ती निर्मिती आणि जागतिक आर्थिक विस्तारासाठी कशी मार्गक्रमण करत आहे, याचा ग्लोबल इन्व्हेस्टर्स फोरमने सखोल अभ्यास केला आहे. यासंदर्भात नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (NSE) चे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आशिष चौहान यांनी भाष्य केले आहे.
शिखर परिषदेत चौहान यांनी सार्वजनिक सूचीची भूमिका, गुंतवणूकदारांच्या आत्मविश्वासाची गतिशीलता आणि नियामक प्रगती यावर भाष्य करुन आपले मत मांडले.

अमेरिकेच्या तुलनेत भारतातील लिस्टींग नियमांबद्दल बोलताना ते म्हणाले, "भविष्यात 80 टक्के मालमत्ता गैर-भौतिक किंवा अमूर्त स्वरुपातील मालमत्ता असतील. भविष्यातील बहुतेक मालमत्ता अनुभवाच्या मालमत्ता असतील, ज्यावर शुल्क लादणे सोपे नाही."
सोरिन इन्व्हेस्टमेंट्सचे संस्थापक संजय नायर यांनी जागतिक व्यापार गतीशीलतेतील बदलावर यावेळी प्रकाश टाकला. ते म्हणाले "टॅरिफच्या मागे लपण्याची वेळ आता संपली आहे. खाजगी क्षेत्राला त्यांच्या सप्लाय चैनची पुनर्रचना करावी लागेल, त्यासंबंधीच्या बाजारपेठांमध्ये विविधता आणावी लागेल, मोठे आणि अधिक कार्यक्षम व्यवसाय तयार करावे लागतील, जर त्यांना निर्यातीची संधी मिळवायची असेल तर, स्थीर नियमांचे पालन करावे लागेल.
"आम्ही अनेक वर्षांपासून उच्च परतावा आणि अत्यल्प अस्थिरतेची व्यवस्था पाहिली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबरपर्यंत ही परिस्थिती बदलली; आता, कमी परतावा आणि उच्च अस्थिरता राहील असे हे बाजाराचे स्वरूप आहे; तुम्हाला एकाच वेळी चांगली बातमी आणि उत्तम किमती मिळणार नाहीत. काही महिन्यांत, भारत पुन्हा विकासासाठी आवश्यक असलेला दुसरा उत्पन्नात वाढ असलेला देश म्हणून उदयास येईल." हेही ते म्हणाले. तर नुवामा कॅपिटल मार्केट्सचे अध्यक्ष आणि प्रमुख शिव सेहगल यांनी 'भारतातील भांडवली बाजार - निरीक्षण अस्थिरता आणि दीर्घकालीन वाढ' या विषयावरील चर्चेत आपले मत व्यक्त केले.
भारतीय स्टार्टअप्सचे ग्राहक उत्पादनांकडून मोठ्या प्रमाणावर समस्या सोडवणे, सखोल तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्णतेकडे लक्ष केंद्रित करण्याबद्दल अलीकडील चर्चेला उत्तर देताना, नून ग्रुपचे सीईओ फराज खालिद म्हणाले की, "तुम्ही AI आणि त्याचे ॲप्लिकेशन कसे लागू करता ते एक मोठा नफ्याचा सेतू तयार करणार आहे आणि त्यांच्या जवळच्या ग्राहकांसाठी नावीन्य आणि संधी उपलब्ध होणार आहे."
या चर्चेवर भाष्य करताना, टायटन कॅपिटल आणि स्नॅपडीलचे सहसंस्थापक कुणाल बहल म्हणाले, "भारतात आमच्याकडे विविध समस्या सोडवणारे व्यवसाय आहेत. आपण ते सर्व साकारले पाहिजेत. त्याचवेळी, आपण आपल्या क्षेत्राच्या कक्षा वाढवल्या पाहिजेत आणि जर आपल्याला सखोल-तांत्रिक नावीन्य अर्थात 'डीप टेक इनोव्हेशन' हवे असेल, तर दिर्घकालीन पावले उचलावी लागतील, ही एका रात्रीत होणारी गोष्ट नाही. हेही त्यांनी स्पष्ट केले.
सीईओ, धोरणकर्ते, जागतिक गुंतवणूकदार आणि उद्योगातील दिग्गज नेते जागतिक स्तरावर भारताच्या भविष्याला आकार देण्यासाठी निष्कर्ष शोधण्याचे काम करत आहे. पुढील 25 वर्षांसाठी भारत गुंतवणूक, तंत्रज्ञान, शाश्वतता आणि नवोन्मेष म्हणजेच 'इनोव्हेशन' यातील जागतिक महासत्ता म्हणून देश उदयास येत आहे.












Click it and Unblock the Notifications