भारत चीन सीमेसंदर्भात झाला मोठा निर्णय; दोन्ही देश LACमधून सैन्य मागे घेऊ शकतात

भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून गेल्या अनेक वर्षांपासून वाद आहेत. भारताच्या अरुणाचल प्रदेश या राज्यावर चीनने दावा सांगितला आहे तसेच भारतातील काही गावे नकाशात आपल्या विभागात समाविष्ट करून घेतल्यामुळे चीन आणि भारत संबंध ताणले गेले आहेत. त्यातच गळवान चा खोऱ्यात चिनी सैनिकांनी केलेल्या आगळीकीमुळे दोन्ही देशांच्या जवानांमध्ये प्रचंड हाणामारी झाली यात दोन्ही देशांचे अनेक सैनिक मारले गेले. तेव्हापासून भारत चीन संबंध आणखी ताणले गेले आहेत. दरम्यान भारत आणि चीन यांच्या दरम्यान असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या संदर्भात नवीन तोडगा काढण्यात आला आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एक निवेदन प्रसिद्धीस देऊन ही माहिती दिली. . चीनचे राष्ट्रपती क्षी जिनपिंग यांच्याशी झालेल्या चर्चेच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री म्हणाले की, "गेल्या अनेक आठवड्यांपासून भारत आणि चीन यांच्या दरम्यान राजकीय आणि लष्करी चर्चा सुरू आहेत."

घेण्यात आला हा महत्वपूर्ण निर्णय

भारत आणि चीन या दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून आपल्या जवानांना मागे घेण्याचा तसेच गस्त घालण्यास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही तडजोड देपसांग आणि डेमचोक या प्रदेशातील गस्तीशी संबंधित आहे. दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही वादग्रस्त ठिकाणी गस्त घालण्यास सुरुवात करण्यात आली आहे आणि लवकरच दोन्ही देश आपल्या जवानांना येथून मागे घेण्यास प्रारंभ करतील ज्याला लष्करी भाषेत डिस्टिंगेटमेंट असे म्हणतात. परराष्ट्र व्यवहार सचिव विक्रम मिस्त्री यांनी यासंदर्भातील माहिती दिली. गस्त घालण्याच्या संदर्भात दोन्ही देशात एकमत झाल्यामुळे 2020 मध्ये पूर्व लडाखमध्ये झालेल्या तणावावर हळूहळू तोडगा निघत आहे.

India China Border Dispute

ब्रिक्स परिषदेपूर्वी तोडगा

ही महत्त्वपूर्ण घटना 22 आणि 23 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सोळाव्या ब्रिक्स परिषदेच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यापूर्वी घडली आहे. ब्रिक्स परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती क्षी जिनपिंग यांच्या दरम्यान होऊ घातलेल्या चर्चे संदर्भात विक्रम मिस्त्री म्हणाले की, गेल्या अनेक आठवड्यापासून भारत आणि चीन यांच्या दरम्यान राजकीय आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या दरम्यान चर्चा सुरू होती. चीन बरोबर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या संदर्भात एकमत झाले आहे. लष्कर मागे घेणे आणि तोडगा काढण्यासाठी गस्त घालण्याची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. दोन्ही देशांच्या चर्चेच्या विषयावर आम्ही वेळेच्या अनुसार काम करीत आहोत.

तणाव कमी होण्यासाठी मदत

उभय देशांच्या अधिकाऱ्यांच्या दरम्यान झालेल्या चर्चेनंतर भारत आणि चीन यांनी पूर्व लडाख मधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालण्यासंदर्भात उभय मान्य तोडगा काढला आहे. या तोडग्यामुळे दोन्ही देशा दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर झालेला तणाव कमी होण्यास मदत होणार आहे. उर्वरित मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी भारत आणि चीन यांचे प्रतिनिधी गेल्या काही आठवड्यापासून एकमेकांच्या संपर्कात आहेत. लडाख येथील गळवान खोऱ्यात 2020 मध्ये 15 आणि 16 जून रोजी भारत आणि चीन यांच्या सैनिकां दरम्यान चकमक झाली होती. या चकमकीत वीस भारतीय सैनिक तर भारताच्या तुलनेत दुप्पट संख्येने चीनचे सैनिक ठार झाले होते मात्र चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने आपल्या सैनिकांच्या संदर्भात अधिकृत आकडेवारी कधीही जाहीर केली नाही.

असा आहे ब्रिक्स परिषदेचा कार्यक्रम

या घटनेनंतर दोन्ही देशा दरम्यान तणावपूर्ण संबंध होते. ब्रिक्सची परिषद रशियाच्या कजान शहरात 22 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. पहिल्या दिवशी ब्रिक्सच्या नेत्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. 23 ऑक्टोबर रोजी मुख्य सत्र होतील. सकाळच्या सत्रानंतर दुपारी मुख्य विषयावर खुले सत्र घेण्यात येईल. या परिषदेत कजान घोषणा पत्राची स्वीकृती केली जाण्याची आशा आहे. या घोषणापत्रात पुढील मार्ग निश्चित करण्यात येईल. 24 ऑक्टोबर रोजी ही परिषद संपेल मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 ऑक्टोबर रोजी दिल्लीत परत येतील.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+