त्या 'लाल फाईल'मध्ये काय आहे? अमित शहांनी घेतली राष्ट्रपतींची भेट; पाकिस्तानची बर्बादी सुरु होणार?
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत सरकार अॅक्टीव्ह मोडमध्ये आले आहे. २६ पर्यटकांची हत्या केल्यानंतर दिल्लीतील राजकारण जोरात फिरु लागले आहे. गुरुवारी सायंकाळी अचानक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर राष्ट्रपती भवनात दाखल झाले. त्यांनी तातडीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या भेटीत गृहमंत्री शहा यांच्या हातात लाल रंगाच्या दोन फाईल होत्या. या फाईलमध्ये नेमके काय होते? राष्ट्रपतींनी त्यावर सही केली का? हे प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, या भेटीनंतर पुन्हा दिल्लीतील राजकारण वेगाने फिरु लागले आहे.

शहांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गुरुवारी संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. त्याच्या हातात लाल रंगाची 'गुप्त' फाईल होती. पहलगाम हल्ल्यानंतर तातडीने राष्ट्रपती भवनात बैठक झाल्याने बैठकीची वेळ आणि दोन्ही मंत्र्यांची बाँडीलँग्वेज पाहता, पाकिस्तानचे टेन्शन वाढले असणार. त्या फाईलमध्ये पाकिस्तानविरुद्धची आक्रमक रणनिती असल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानची चहूबाजुने कोंडी करण्याचा भारताचा प्रयत्न असल्याचेही सांगितले जात आहे.
Union Minister for Home Affairs and Cooperation, Shri Amit Shah and Minister of External Affairs, Dr S Jaishankar called on President Droupadi Murmu at Rashtrapati Bhavan. pic.twitter.com/pk6XQFeHc5
— President of India (@rashtrapatibhvn) April 24, 2025
राष्ट्रपतींनी सही केली का?
पाकिस्तानविरुद्धची आक्रमक रणनीती असणाऱ्या या फाईलवर राष्ट्रपतींनी सही केली का? हे दोन्ही मंत्री राष्ट्रपतींकडे कशाची मंजुरी घेण्यासाठी गेले होते? हे प्रश्न सध्या चर्चेत आले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारत अॅक्शन मोडमध्ये आहे. परराष्ट्र मंत्रालयापासून ते गुप्तचर संस्थांपर्यंत सर्वजण पाकिस्तानला घेरण्याची तयारी करत आहेत. आता ही लाल फाईल राष्ट्रपतींच्या हातात असल्याने, काहीतरी मोठे घडणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
सरकार अँक्शन मोडवर
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा समितीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार तात्काळ स्थगित करण्यात आला. अटारी सीमा देखील बंद करण्यात आली. भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले. याशिवाय पाकिस्तानी राजदूतांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच लष्कराला हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाने घेतली बैठक
हल्ल्यानंतर भारताने २०० देशांतील राजदूतांना बोलावून दहशतवादी हल्ल्याची सविस्तर माहिती दिली. परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिका, ब्रिटन, रशिया, फ्रान्स, जर्मनी, जपान, चीन, इटली, इंडोनेशिया, मलेशिया, ओमान, युएई, कतार आणि नॉर्वे यासह डझनभर देशांना पाकिस्तानी भूमीवरून कार्यरत असलेली दहशतवादी व्यवस्थेचे पुरावे दिले. हा हल्ला जम्मू आणि काश्मीरमधील लोकशाही व प्रगतीला अडथळा आणण्याचा कटअसल्याचे भारतीय लष्कराचे म्हणणे होते. भारताने स्पष्ट केले आहे की ते सीमापार दहशतवादावर गप्प बसणार नाही.












Click it and Unblock the Notifications