Hathras stampede: 'त्याला सोडले जाणार नाही...', अपघातानंतर 'भोले बाबा'ची पहिली प्रतिक्रिया
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात मंगळवारी आयोजित सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 121 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातानंतर नारायण साकार यांचे पहिले वक्तव्य समोर आले आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बाबा सूरजपाल उर्फ नारायण साकार हरी भोले बाबा म्हणाले की, 2 जुलैच्या घटनेनंतर आम्ही खूप दुःखी आहोत. देव आम्हाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.
#WATCH | Hathras Stampede Accident | Mainpuri, UP: In a video statement, Surajpal also known as 'Bhole Baba' says, "... I am deeply saddened after the incident of July 2. May God give us the strength to bear this pain. Please keep faith in the government and the administration. I… pic.twitter.com/7HSrK2WNEM
— ANI (@ANI) July 6, 2024
कृपया सरकार आणि प्रशासनावर विश्वास ठेवा. मला विश्वास आहे की, ज्याने प्रत्येक एकता पसरवली आहे. त्याला सोडले जाणार नाही. आम्ही आमचे वकील डॉ. ए.पी. सिंग यांच्या मार्फत समितीच्या महापुरुषांना विनंती केली आहे की, त्यांनी आयुष्यभर मृतांच्या कुटुंबियांच्या आणि उपचाराधीन जखमींच्या पाठीशी उभे राहावे.
बाबा पुढे म्हणाले की, सर्वांनी माझी विनंती मान्य केली आहे आणि आपली जबाबदारीही पार पाडत आहे.मृत कुटूंबाच्या नातेवाईकांना मदत केली जाईल, असेही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका धार्मिक कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत 121 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये बहुतांश महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेत स्वयंभू महाराज 'भोले बाबा' उर्फ नारायण साकार हरी यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
आयोजन समितीशी संबंधित सहा जणांना अटक
उत्तर प्रदेश पोलिसांनी गुरुवारी कार्यक्रमाच्या आयोजन समितीशी संबंधित सहा जणांना अटक केली. पोलिसांच्या अंतर्गत तपास अहवालात व्यवस्थापन आणि सुरक्षा प्रोटोकॉलमधील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications