Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पंतप्रधान मोदींकडून गांधीजी, शास्त्रीजींना अभिवादन; राजघाटावर नेत्यांची गर्दी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्मा गांधी जयंतीनिमित्त बुधवारी दिल्ली येथील राजघाटावर जात महात्मा गांधींना नमन केले. त्यांच्या स्मृतीस्थळाला वंदन केलं. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या एक्स या सोशल मिडिया अकाऊंटवरही गांधीजींना श्रद्धांजली अर्पण केली. तेथे शुभेच्छा संदेश पोस्ट करत नरेंद्र मोदींनी महात्मा गांधींप्रति आपली भावना व्यक्त केली.

सगळ्या देशवासियांच्यावतीने पूज्य बापुजींना त्यांच्या जयंतीनिमित्त शतशत नमन. सत्य, सद्भाव आणि समानतेवर आधारित त्यांचे जीवन सगळ्यांसाठी आदर्श राहो, हीच प्रार्थना.. असं म्हणत त्यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवरही गांधीजींना श्रद्धांजली अर्पण केली. याशिवाय माजी पंतप्रधान लाल बहुदूर शास्त्री यांनाही यांच्या जयंतीनिमित्तही मोदींनी अभिवादन केले.

Mahatma Gandhi and Lal Bahadur Shashri

राजघाटावर नेत्यांची गर्दी

गांधी जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी आज हजारीबाग येथे जात आहेत. तेथे 83 हजार कोटींच्या योजनांची घोषणा ते करणार आहेत. याशिवाय या योजनांच्या कोनशिलेचे उद्धाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांनीही महात्मा गांधीजींना श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान मोदी आज राजघाटावर गेले त्यावेळी केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टरही तेथे उपस्थित होते.

महात्मा गांधी जयंतीनिमित्त अभिवादन

संपूर्ण देशात बापू नावाने परिचित असलेले महान अहिंसावादी नेते मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म गुजरातच्या पोरबंदर येथे 2 ऑक्टोबर 1869 साली झाला होता. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालत इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून भारताची मुक्तता केली. गांधीजींनी त्यांच्या आयुष्यात केलेल्या अनेक आंदोलनाने इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले होते. स्वातंत्र्यानंतर 30 जानेवारी 1948 साली नथूराम गोडसे यांनी गोळी मारुन गांधीजींची हत्या केली होती.

लाल बहादूर शास्त्रींनाही केले नमन

लाल बहादूर शास्त्री हे देशाचे दुसरे प्रंतप्रधान होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोंबर 1904 साली उत्तरप्रदेशातल्या मुगलसराय येथे झाला होता. याच गावाला आज पंडीत दीनदयाल उपाध्याय नगर असेही संबोधले जाते. पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर लाल बहादूर शास्त्री देशाचे दुसरे पंतप्रधान झाले. त्यांचे निधन 11 जानेवारी 1966 साली काश्कंदला झाले. मात्र त्यांचा मृत्यू आजही एक रहस्यच आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+