Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'येथे' बांधले जातेय भारतातील पहिले हिंदू गाव; किती आहेत कुटुंब? घराची किंमत किती? वाद का होतोय? वाचा

भाजप सत्तेत आल्यानंतर हिंदूराष्ट्र ही संकल्पना चांगलीच चर्चेत आली. या मुद्यावरुन अनेकदा राजकारण तापले. हिंदूराष्ट्राच्या संकल्पनेतूनच भाजप सत्तेत आली, असेही सांगितले गेले. आता देशात एक नवीन वाद सुरु झालाय. देशातील एका राज्यात हिंदू गाव तयार होत आहे. नुकतीच वैदीक मंत्रोपचारात या गावाची मुहुर्तमेढही रोवण्यात आली. आता ही बातमी समोर येते न येतो तोच, या गावावरुन वाद सुरु झाला आहे. हिंदू गावाच्या घोषणेवरुन काँग्रेस व भाजप समोरासमोर आले आहे.

Hindu village to be built in India

कोठे बांधले जाणार हिंदू गाव?

पंडित धीरेंद्र शास्त्री अर्थात बागेश्वर बाबा हिंदू गाव बांधणार आहेत. हिंदू एकता यात्रेनंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी देशातील पहिल्या हिंदू गावाचा पाया रचला. हे गाव पुढील दोन वर्षांत तयार होईल. धीरेंद्र शास्त्री यांनी वैदिक मंत्रांने या गावाचे भूमिपूजन केले.

कसे असणार हिंदू गाव?

बागेश्वर धाममध्ये हिंदू गाव स्थापन करण्यासाठी 1,000 घरांच्या बांधकामाची पायाभरणी नुकतीच धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केली. त्यांनी यावेळी सांगितले की, हिंदू राष्ट्राचे स्वप्न हिंदू घरापासून सुरू होते. हिंदू कुटुंबे, हिंदू समाज आणि हिंदू गावे, हिंदू तहसील, हिंदू जिल्हे आणि हिंदू राज्ये निर्माण झाल्यानंतरच हिंदू राष्ट्राची संकल्पना साकार होईल. लोक ही घरे फक्त त्यांच्या आयुष्यभरासाठी खरेदी करू शकतील. ते विकता येत नाहीत.

किती असेल घराची किंमत?

बागेश्वर धाम येथे तयार होणाऱ्या या हिंदू गावात एक हजार घरे बांधण्यात येणार आहेत. ही घरे १५ लाखांपासून १८ लाखांपर्यंत असतील, असे सांगितले जात आहे. लोकांकडून आलेल्या देणगीतून या घरांचे बांधकाम सुरु करण्यात येणार आहे, असेही सांगितले जात आहे.

घोषणेनंतर राजकारण तापले

या प्रकल्पाची पायाभरणी करताच, मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन गावे बांधण्याची परवानगी मिळावी अशी मागणी होऊ लागली. हिंदू गावाच्या घोषणेवरून काँग्रेस आणि भाजप नेते आमनेसामने आले आहेत. काँग्रेस प्रवक्ते अब्बास हाफिज यांनी प्रश्न उपस्थित केले. मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन गावांना परवानगी देण्याची मागणी करताना त्यांनी मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याकडे केली.

काँग्रेसचा हल्लाबोल

काँग्रेसचे राज्य मीडिया प्रभारी मुकेश नायक यांनीही या घोषणेनंतर हल्लाबोल केला. ते म्हणाला की, शास्त्रीजी मोदीजींना संविधानात सुधारणा करण्यास सांगावे. भाजपने नेहमीच संत आणि ऋषींचा शस्त्र म्हणून वापर केला आहे. सध्या पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे भाजपचे सर्वात धारदार हत्यार आहेत. याआधी भाजप उमा भारती आणि साध्वी ऋतंभरा सारख्या संतांचा वापर करत होते. शास्त्रीजींना माझा सल्ला आहे की त्यांनी भाजप कार्यकर्त्यासारखे काम करू नये. समाजात त्याचा खूप आदर केला जातो, हे लक्षात ठेवा.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+