Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

24 वर्षानंतरही झारखंडवर बिहारची राजकीय छाया कायम; बिहारच्या राजकीय पक्षांचा, नेत्यांचा बोलबाला

24 वर्षांपूर्वी झारखंड हे स्वतंत्र राज्यघोषित झाले. बिहारमधून झारखंड वेगळे काढण्यात आले. मात्र झारखंडच्या राजकारणावर 24 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतरही बिहारच्या राजकीय संस्कृतीची छाया अद्याप कायम आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीत बिहारमधील राजकीय पक्षांचा प्रभाव स्पष्टपणे नजरेस येत आहे.. झारखंड निवडणुकीत जागावाटप, जातीय आव्हाने आणि भाषा तसेच अन्य घडामोडी मध्ये बिहारची संस्कृती डोकावते आहे

"झारखंड अबुवा" ( झारखंड आमचे आहे) अशी घोषणा या राज्यात एकेकाळी दिली जायची. मात्र स्वतंत्र राज्य झाल्यानंतरही राष्ट्रीय जनता दल, लोक जनशक्ती पार्टी आणि संयुक्त जनता दल अशा बिहारमधील राजकीय पक्षांनी झारखंडमध्ये चांगलीच पाळेमुळे घट्ट केली आहेत. या पक्षांचा झारखंडमध्ये मोठा मतदार वर्ग आहे. झारखंडच्या राजकीय परिस्थितीचा अभ्यास करता झारखंड आणि बिहार या दोन राज्यांमध्ये असलेले जातीय, भाषिक आणि राजकीय अनुबंध स्पष्ट होतात.

Jharkhand Assembly Election 2024

निवडणूक रणनीतीला अंतिम स्वरूप देताना महत्त्वाची भूमिका

झारखंडमधील राजकीय धोरण ठरवताना बिहारमधील राजकीय पक्षांचा प्रामुख्याने विचार केला जातो. 2011 च्या जनगणनेच्या अनुसार बिहारमधील आंतरराज्य प्रवाशामधील मोठा वर्ग झारखंड मध्ये स्थिरावला आणि त्यामुळेच झारखंड आणि बिहार या दोन राज्यातील सीमारेषा धूसर होत गेली. त्यामुळेच बिहार आणि झारखंड यांनी राजकीय स्थिती आणि समीकरणे एकमेकांत गुंतलेली आहेत.

जाती आधारित राजकीय पक्षांचा प्रभाव

झारखंडमध्ये एक जातीव्यवस्था स्थिर झाली आहे, ज्यात इतर मागास वर्गाचा मोठा वाटा आहे आणि तो दोन्ही राज्यात लोकसंख्येच्या 50 टक्के इतका आहे. त्याचा मोठा फायदा राष्ट्रीय जनता दल आणि संयुक्त जनता दल असे पक्ष आपला राजकीय प्रभाव वाढवण्यासाठी करून घेत असल्याचे निदर्शनास येते. बिहारमध्ये प्रामुख्याने ओबीसी राजकारण मध्यवर्ती असते. लालूप्रसाद यादव हे त्याचे मोठे उदाहरण आहे.

बिहार मधील दिग्गज झारखंडमध्ये

झारखंडच्या निवडणुकीत बिहारमधील बड्या राजकीय नेत्यांची उपस्थिती बिहार आणि झारखंडच्या एकसाची राजकीय स्थितीचे निदर्शक आहे. पप्पू यादव, जितेंद्र मांझी तसेच अन्य नेत्यांची झारखंडमध्ये नेहमी ये जा असते. वेगवेगळ्या आघाड्यांचे नेते विशिष्ट जाती प्रवर्गात आपला प्रभाव निर्माण करीत असतात. त्यामुळेच बिहारची जातीय समीकरणे झारखंडमध्येही अवलंबिली जातात.

झारखंड मधील सद्यस्थिती

झारखंडमध्ये यावेळची निवडणूक अत्यंत गुंतागुंतीची ठरली. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि ईंडी आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये झालेले जागावाटप खूपच चर्चेचा विषय ठरले.. राष्ट्रीय जनता दलाने अधिक जागांची मागणी केल्याने इंडी आघाडीत तणाव निर्माण झाला. तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाही सुसंगत राजकीय रणनीती आखताना आणि प्रचार करताना आपल्या सहकारी पक्षांसोबत जाती आधारित आवाहन करण्याचे आव्हान निर्माण झाले होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+