'या' राजकारण्यांनी २०२४ मध्ये घेतला जगाचा निरोप; वाचा कोणते होते दिग्गज
Lookback 2024 Politics - सरते २०२४ हे वर्ष भारतीय राजकारणासाठी महत्त्वाचे ठरले. यावर्षी लोकसभा व महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुका झाल्या. तसेच यावर्षी भारतातील अनेक दिग्गज राजकारण्यांनी जगाचा निरोपही घेतला. यावर्षी शेवटच्या श्वास घेणारे कोण होते दिग्गज, ते आपण पाहूयात...

नटवर सिंग
ज्येष्ठ नेते नटवर सिंग यांचे १० ऑगस्टला निधन झाले. नुकतेच निधन झालेले पंतप्रधान डाँ. मनमोहन सिंग यांच्या पहिल्याच युपीए सरकारमध्ये नटवरसिंग हे परराष्ट्रमंत्री होते. भारतीय परराष्ट्र सेवेतच सुरुवातीला नटवरसिंग यांनी नोकरी केली होती. १९८४ मध्ये त्यांनी नोकरीतून निवृत्ती घेतली. त्यानंतर ते लोकसभा खासदार म्हणूनही राहिले. नटवरसिंग यांच्या निधनानेही राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली.
सीताराम येंच्युरी
भारतातील ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या सीताराम येंच्युरी यांचे १२ सप्टेंबरला निधन झाले. मृत्यूसमयी ते ७२वर्षांचे होते. पश्चिम बंगालमधून ते राज्यसभेवर २००५ ते २०१७ असे तब्बल बारा वर्षे खासदार राहिले होते. ते कम्युनिष्ठ पक्षाचे सचिव देखील राहिले होते. याच पक्षाच्या पाँलिट ब्युरोचे ते १९९२ पासून सदस्य होते. या ज्येष्ठ नेत्याच्या निधनानंतर चांगलीच हळहळ व्यक्त करण्यात आली.
जित्ता रामकृष्ण रेड्डी
भारत राष्ट्र समितीचे नेते जित्ता रेड्डी यांचे ६ सप्टेंबरला निधन झाले. निधनावेळी ते फक्त ५२ वर्षांचे होते. रेड्डी यांनी बीआरएसचा युवा नेता म्हणून राजकारणाला सुरुवात केली होती. अल्पावधितच त्यांनी आपल्या पक्षात लोकप्रियता मिळवली होती. त्यांच्या निधनानंतरही त्यांच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला.
बाबा सिद्धीकी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्धीकी यांची १२ ऑक्टोंबरला गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सिद्दीकी हे काँग्रेसचे चार वेळा आमदार राहिले होते. काही हल्लेखोरांनी त्यांच्या मुलाच्या ऑफीससमोरच त्यांच्यावर गोळीबार केला. या हत्येची जबाबदारी लाँरेन्स बिश्नोई गँगने घेतली. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरु असली तरी, या हत्येनंतर चांगलीच खळबळ उडाली होती.
डाँ. मनमोहन सिंग
देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे २६ डिसेंबरला एम्स रुग्णालया निधन झाले. मृत्यूसमयी ते ९२ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्यत मालवली. त्यांच्या निधनामुळे अवघ्या देशावर शोककळा पसरली. मनमोहन सिंग ३३ वर्षे खासदार होते. विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांच्याकडे पाहिले जायचे. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर ते पहिलेच असे पंतप्रधान होते, जे १० वर्षे देशाचा राज्यकारभार सांभाळू शकले.












Click it and Unblock the Notifications