दिल्ली घटनेत 7 जणांना अटक, हे लज्जास्पद! त्या 3 तरुणांच्या स्वप्नांचा चुराडा 'या' नेत्याचे वक्तव्य
नवी दिल्ली - 27 जुलै रोजी जुनी दिल्ला कोचिंग इन्स्टिट्यूटच्या तळघरात पाणी भरल्याने आयएएसची तयारी करणाऱ्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर एकूण सात जणांना अटक झाली आहे, दरम्यान आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. यावर काँग्रेस नेते शशी थरुर यांनीही मोठे वक्तव्य केले आहे.
आप सरकारविरुद्ध निदर्शने
जुन्या राजिंदर नगरच्या या घटनेनंतर आज सकाळी दिल्ली भाजपचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी दिल्लीत आम आदमी सरकारविरोधात विरोधात निदर्शने केली.

यावेळी आम आदमी पक्षाच्या कार्यालयाजवळ मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते गोळा झाले असून त्यांनी अरविंद केजरीवाल सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच या घटनेतील दोषींवर कारवाईची मागणी केली.
#WATCH | Delhi BJP workers and leaders protest against the AAP government in Delhi, near AAP Office, over the Old Rajinder Nagar incident where 3 students died after the basement of a coaching institute was filled with water on July 27. pic.twitter.com/LgMBPBKqta
— ANI (@ANI) July 29, 2024
काय घडली होती घटना?
जुन्या दिल्लीतील राजेंद्रनगर भागात जवळपास दहा कोचिंग सेंटर आहे. या कोचिंग सेंटरच्या लायब्ररी तळघरात असून राऊ आयएस कोचिंग सेंटरच्या तळघरातील लायब्ररीत मोठ्या संख्यने पाणी जमा झाले. यात तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. 27 जुलैला ही घटना घडली होती.
#WATCH | On Delhi's Old Rajinder Nagar incident, Congress MP Shashi Tharoor says, "This is shameful, there is no doubt about it...The dreams of those youth have been shattered, the hopes of their families have been snuffed too. This is extremely saddening for the country, for its… pic.twitter.com/r3jhcxYZKY
राजेंद्रनगर येथील घटनेनंतर काल आयएएसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन करत दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली होती. तसेच धरणेही या विद्यार्थ्यांनी दिले होते. मृत तीन विद्यार्थ्यांना श्रद्धांजली देत कँडल मार्चही काढण्यात आला होता. दरम्यान आम आदमी पक्ष आणि भाजपमध्येही यावरुन जोरदार टीका सुरु आहे.
काय म्हणाले शशी थरुर?
दिल्लीच्या जुन्या राजिंदर नगरच्या घटनेवर काँग्रेस खासदार शशी थरूर म्हणतात, "हे लज्जास्पद आहे, यात शंका नाही... त्या तरुणांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांच्या आशाही धुळीला मिळाल्या आहेत. हे अत्यंत दुःखद आहे. देशासाठी, त्याच्या भविष्यासाठी आणि तरुणांच्या भविष्यासाठी तुम्ही काय उपाय काढू शकता?... होय, नुकसान भरपाईची तरतूद करणे आवश्यक आहे जेणेकरुन पुन्हा तेच नुकसान कोणालाही सहन करावे लागणार नाही..."
कठोर कारवाई करणार - डीसीपी एम. हर्षवर्धन
दिल्लीच्या जुन्या राजिंदर नगरमध्ये 3 UPSC उमेदवारांच्या मृत्यूबद्दल बोलताना, DCP सेंट्रल एम हर्षवर्धन म्हणतात, "तळघराच्या मालकांसह आणखी पाच जणांना आणि इमारतीच्या गेटला नुकसान झालेल्या वाहन चालवणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
#WATCH | Speaking on the death of 3 UPSC aspirants in Delhi's Old Rajinder Nagar, DCP Central M Harshavardhan says, "Five more people including owners of the basement & an individual who drove a vehicle which appears to have damaged the gate of the building, arrested. There was… pic.twitter.com/DcPOPEP9Hu
— ANI (@ANI) July 29, 2024
तळघरात व्यावसायिक क्रियाकलाप करण्यासाठी आम्ही काही माहिती मागवली आहे, आणि आम्ही त्यांची भूमिका तपासू, आम्ही आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचे आवाहन करतो मुख्य रस्ते, आणि या प्रकरणात कठोर कारवाई केली जाईल असा विश्वास आहे."

कोचिंग सेंटरमध्ये पाण्यात तिघांच्या मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर दिल्लीच्या करोलबागमध्ये काल सुरु झालेले विद्यार्थ्यांचे आंदोलन आजही सुरूच आहे.












Click it and Unblock the Notifications