काँग्रेसची दिल्लीकरांना दुसरी गॅरंटी, 'जीवन रक्षा योजने'ची घोषणा, 25 लाखांचा विमा मिळणार
Delhi Assembly election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. दिल्लीत येत्या 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून निकाल 8 फेब्रुवारीला लागणार आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्व पक्ष निवडणूकीच्या तयार लागले आहेत.
कॉंग्रेसने आज पत्रकार परिषद घेऊन दिल्लीकरांसाठी जीवन रक्षा योजनाची घोषणा केली आहे. काँग्रेसने महिलांसाठी 'प्यारी दीदी' योजनेनंतर आता बुधवारी जीवन रक्षा योजना (Jeevan Raksha Yojana) जाहीर केली आहे. दिल्लीत सत्तेवर आल्यास लोकांना 25 लाखांचा आरोग्य विमा देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिलं आहे.

राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक गेहलोत दुसरी गॅंरटी जाहीर करताना म्हणाले की, "आम्ही आरोग्याला भरपूर कव्हरेज दिले आहे. 'जीवन रक्षा योजना' ही राजस्थानमधील माजी काँग्रेस सरकारच्या 'चिरंजीवी योजने' सारखीच असेल. मला आनंद आहे की, मला ही योजना दिल्लीत सुरू करण्याची संधी मिळाली आहे.
दिल्लीतील रहिवाशांना 25 लाख रुपयांचा आरोग्य विमा
प्रत्येक दिल्लीकराला 25 लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळेल, असा दावा करत काँग्रेसने बुधवारी दिल्लीतील जनतेसाठी दुसरी गॅरंटी जाहीर केली आहे. तसेच उपचार मोफत असतील. जीवन रक्षा योजनेची घोषणा करताना अशोक गेहलोत म्हणाले की, दिल्लीत काँग्रेसचे सरकार आल्यास प्रत्येक दिल्लीकराला 25 लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळेल.
#WATCH दिल्ली: कांग्रेस ने दिल्ली विधानसभा चुनाव से पहले 25 लाख रुपये का स्वास्थ्य कवर देने वाली 'जीवन रक्षा योजना' की घोषणा की। pic.twitter.com/menLWjnNuG
— ANI_HindiNews (@AHindinews) January 8, 2025
अशोक गेहलोत यांची कॉंग्रेसवर जोरदार टीका
पक्षाच्या आरोग्य विमा योजनेबाबत बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, आम्ही राजस्थानमध्येही सार्वजनिक आरोग्याला विशेष प्राधान्य दिले आहे. आमच्याकडे सर्व प्रकारचे उपचार मोफत असून त्याचा खर्च सरकार उचलते.
सत्ताधारी 'आप'वर निशाणा साधत गेहलोत म्हणाले, "आप आमच्यासाठी विरोधक आहेत. दोनदा जिंकले असते तर या वेळीही जिंकू असा त्यांचा भ्रम आहे. यावेळी वातावरण बदललेले दिसते. काँग्रेसचा खूप चांगल्या पद्धतीने निवडणूक प्रचार चालू आहे आणि यावेळी चांगले निकाल लागतील अशी अपेक्षा आहे." असं गेहलोत यांनी म्हटलं आहे.
दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष आणि बदली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार देवेंद्र यादव म्हणाले, "आपने भरपूर आश्वासने दिली, परंतु ती पूर्ण करण्याचे काम केले नाही. दिल्लीतील प्रदूषण, भेसळ आणि दूषित पाण्याचा परिणाम लक्षात घेऊन आज आम्ही दिल्लीतील लोकांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच आम्ही आज ही योजना आणली असल्याचं यादव यांनी सांगितले.












Click it and Unblock the Notifications