Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अरविंद केजरीवाल यांची हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांवर टीका, म्हणाले- 'शाप लागेल तुम्हाला'

Delhi Assembly election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आता आरोप-प्रत्योरापांनी राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. मतदानाची तारीख जशीजशी जवळ येत आहे तसं आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील शाब्दिक युद्ध तीव्र होत चालले आहे. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी यमुनेच्या पाण्याबाबत हरियाणाचे मुख्यमंत्री सैनी यांच्या आव्हानाला उत्तर दिलं आहे.

केजरीवाल म्हणाले की, मुख्यमंत्री आतिशी यांनी पाण्याच्या मुद्द्यावर आज पुन्हा निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. निवडणूक आयोगाने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि मुख्यमंत्री आतिशी यांना आज दुपारी 4 वाजता भेटण्यासाठी वेळ दिला आहे, दोघेही आज निवडणूक आयुक्तांना भेटण्यासाठी जातील.

Arvind Kejriwal

फोटो सौजन्य- पीटीआय

मंगळवारी पत्रकार परिषदेत केजरीवाल म्हणाले, "दिल्ली जल बोर्डाच्या सीईओंनी काल पुष्टी केली आहे की, दिल्लीत येणाऱ्या पाण्यात अमोनिया नावाचे विष आढळले आहे." केजरीवाल यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांना सांगितले की, पाण्यावर राजकारण करू नका. तुम्ही आमच्यावर खटला भराल असे आम्हाला घाबरवून सांगण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही एक केस दाखल करता, किती केस दाखल कराल? तुम्ही आधीच अनेक खटले दाखल केले आहेत आणि आम्हाला तुरुंगात पाठवले आहे, मी दिल्लीच्या लोकांना मरू देणार नाही' असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

दिल्लीच्या लोकांकडून तुम्हाला शाप मिळेल...

पुढे बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, "हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह पाण्यावर राजकारण करू नका, तुम्ही पापाचे दोषी ठराल. तुम्हाला लोक शाप देतील. तुम्ही दिल्लीतील लोकांना घाणेरडे आणि विषारी पाणी प्यायला लावात आहात. तुम्ही आम्हाला धमकी देत ​​आहात की, तुम्ही आमच्यावर खटला दाखल कराल. तर मग खटला करा. तुम्ही खटला दाखल करण्यात काही कसर सोडली आहे का, आम्हाला तुरुंगात पाठवले आहे. आता मला फाशी देणार का? विषारी पाण्याने जनतेला मारणार का?"

केजरीवाल यांनी एक दिवस आधी म्हटले होते की, हरियाणा सरकार दिल्लीत येणाऱ्या यमुनेच्या पाण्यात विष मिसळत आहे. ज्यावर हरियाणाचे मुख्यमंत्री सैनी यांनी उत्तर देताना केजरीवालांवर खोटे बोलण्याचा आरोप केला होता. त्यांनी म्हटलं आहे की, की मी हरियाणाचे सचिव दिल्लीला पाठवत आहे आणि केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्य सचिव पाठवावेत, जिथून हरियाणाचे पाणी दिल्लीला पोहोचते. सैनी यांनी या प्रकरणाची चौकशी करावी या विधानानंतर अरविंद केजरीवाल यांनी आज मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री सैनी आणि भाजपला कोंडीत पकडले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+