धक्कादायक... शिवसेना नेत्यावर जिवघेणा हल्ला, सीसीटीव्ही फुटेज समोर
नवी दिल्ली : पंजाबमधील लुधियाना येथे शिवसेना नेते संदीप थापर यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. काल शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. चार हल्लेखोरांपैकी दोघांना पोलिसांनी तातडीने अटक केली. दरम्यान, गंभीर जखमी झालेले संदीप थापर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शिवसेना नेते संदीप थापर (वय ५८) हे शुक्रवारी लुधियानामध्ये संवेदना ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रविंदर अरोरा यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलजवळील ट्रस्टच्या कार्यालयातून ते बाहेर आले असता तीन ते चार जणांनी संदीप यांच्यावर तलवारीने हल्ला केला. विशेष म्हणजे संदीप थापर यांच्यासोबत बंदुकधारी गार्डही होते. या वेळी संदीप यांच्या आसपास 40 ते 50 लोक होते.
मात्र तरीही हल्लेखोरांनी तलवारीने हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असून त्यात संदीप त्यांच्या बंदूकधारी रक्षकासोबत हॉस्पिटलबाहेर ट्रॅफिकमध्ये थांबलेले दिसत आहेत. दरम्यान, तीन हल्लेखोर आले. त्यातील दोघांनी संदीपला पकडले. एक जण त्यांच्या बंदूकधारी गार्डशेजारुन निघून गेला. पोलिसांनी तिघा हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
हल्ल्याचं फुटेज व्हायरल
पंजाबच्या लुधियानामध्ये शिवसेनेचे नेते संदीप थापर गोरा यांच्यावर जिवघेणा हल्ला झाला. संदीप थापर गंभीर जखमी असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तीन ते चार हल्लेखोरांनी थापर यांच्यावर धारधार शस्त्रांनी वार केले. सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेरच हा हल्ला करण्यात आला. संवेदना ट्रस्टचे प्रमुख रविंदक अरोरा यांच्या पुण्यातिथी सोहळ्याचे आयोजन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करण्यात आले होते. थापर यांच्यासोबत बंदुकधारी गार्डही होते. तरीही हल्लेखोरांनी हल्ला केला. हल्यानंतर हल्लेखोर 40 ते 50 लोकांसमोरुन दुचाकीवर पळून गेले. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
भाजपचा सरकारवर हल्ला
भाजपच्या पंजाब युनिटचे सरचिटणीस अनिल सरीन म्हणाले की, "मान हे केवळ राज्याचे मुख्यमंत्री नाहीत, तर त्यांच्याकडे गृहखातेही आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे (आप) सरकार आल्यापासून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडत चालली आहे. हत्या, लुटमारीच्या घटनांमध्ये आणि गुंडांगिरीमध्ये वाढ झाली आहे. परिणामी लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पंजाब सरकार कायदा आणि सुव्यवस्थेच्या आघाडीवर पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी अशा घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा."












Click it and Unblock the Notifications