चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके जयंती 2025: फक्त 15 मुद्द्यांत समजून घ्या या चित्रपटमहर्षीला
भारतीय चित्रपटाचे जनक म्हणून ज्यांची ओळख आहे, ते दादासाहेब फाळके हे महाराष्ट्राचे सुपुत्र होते. त्यांच्या जन्म ३० एप्रिल १८७० साली महाराष्ट्रातील नाशिकमध्ये झाला. बुधवारी (ता. ३०) त्यांची जयंती आहे. ते चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथाकारही होते. मुंबईतील मराठा हायस्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी १८८५ साली जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून एक वर्षांची चित्रकलेची पदविकाही पूर्ण केली होती. पुढे ते चित्रपट बनविण्याच्या ध्येयाने झपाटून गेले आणि चित्रपट क्षेत्रात त्यांनी क्रांती केली.

मुंबईतील दादर येथे त्यांनी चित्रपटनिर्मितीगृहाची स्थापना केली. त्यानंतर मुंबईच्या कोरोनेशन चित्रपटगृहात त्यांनी राजा हरिश्चंद्र हा आपला पहिला मुकपट तयार केला. परंतु त्यांच्या आयुष्यातील २० महत्वाच्या गोष्टी आपणा सर्वांना माहित असाव्यात. त्या कोणत्या हेच आम्ही या बातमीतून सांगणार आहोत.
१. दादासाहेब फाळके यांचे खरे नाव धुंडीराज गोविंद फाळके होते. नाशिक येथे ३० एप्रिल १८७० रोजी त्यांचा जुन्म झाला.
२. त्यांचा जन्म रुढीवादी ब्राम्हण कुटुंबात झाला व सहा भावंडात ते सर्वात मोठे होते.
३. दादासाहेब फाळके यांना चित्रकला, शिल्पकला आणि संगीतात या विषयाचेही सखोल ज्ञान होते.
४. छायाचित्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणात ड्राफ्ट्समन म्हणूनही काम केले.
५. दादार येथील चित्रपटगृहात त्यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला मूकपट बनविला. त्याची प्रेरणा ख्रिस्ताचे जीवन (१९१०) या मुकपटातून त्यांनी घेतली.
६. राजा हरिश्चंद्र बनविल्यानंतर त्यांना चित्रपटक्षेत्राचे प्रचंड वेड लागले. त्यानी आपली सर्व मालमत्ता विकली आणि चित्रपट निर्मिती आणि छायांकन शिकण्यासाठी इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतला.
७. दादासाहेब फाळके यांनी १९१३ मध्ये हिंदुस्तान फिल्म कंपनीची स्थापना केली. राजा हरिश्चंद्र ही त्यांची पहिली निर्मिती होती. हा भारतातील पहिला पूर्ण-लांबीचा चित्रपट होता.
८. त्यानंतर दादासाहेब फाळके यांनी त्यांच्या कारकिर्दीत १०० हून अधिक मूकपट बनवले.
९. भारतीय चित्रपटसृष्टीत क्लोज-अप, फेड-इन आणि फेड-आउट्सचा वापर तसेच इतर अनेक तांत्रिक नवकल्पना आणण्याचे श्रेय त्यांना जाते.
१०. ते एक समाजसुधारकही होते. बालविवाह, जातिव्यवस्था यासारख्या सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी त्यांच्या चित्रपटांचा वापर केला.
११. फाळके यांच्या पत्नी सरस्वती फाळके यांनी त्यांच्या चित्रपटनिर्मिती कारकिर्दीत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या अनेक चित्रपटांमध्येही काम केले.
१२. स्वामी विवेकानंदांच्या शिकवणींनी त्यांच्यावर खोलवर प्रभाव होता. ते शाकाहारी होते. निसर्गोपचाराच्या शक्तीवर त्यांचा विश्वास होता.
१३. चित्रपटासाठी त्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांचे घरही विकावे लागले.
१४. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल ब्रिटीश सरकारने १९३७ मध्ये त्यांना "राजा" ही पदवी देऊन सन्मानित केले.
१५. १६ फेब्रुवारी १९४४ रोजी वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.












Click it and Unblock the Notifications