Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Shashi tharoor:ऑपरेशन सिंदूरच्या शिष्टमंडळात थरूर यांच्या नावावरून वाद, काँग्रेस संतापले, काय झालं?

Shashi Tharoor Vs Congress Lead jayram Ramesh : ऑपरेशन सिंदूर आणि सीमापार दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय खासदारांचे 7 शिष्टमंडळ तयार केले आहेत. हे शिष्टमंडळ जगातील प्रमुख देशांना, विशेषतः संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) सदस्य देशांना भेट देणार आहे. दरम्यान, या शिष्टमंडळात कॉंग्रेसकडून नेतृत्व करणारे शशी थरूर यांच्या नावावरुन वाद पेटला आहे. शशी थरूर यांचे नाव कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिले नव्हते. तरी देखील त्यांचे नाव जाहीर झाल्याने कॉंग्रेस विरुद्ध शशी थरूर असा वाद पाहायला मिळत आहे.

Shashi Tharoor

नेमकं काय घडलं, जाणून घ्या सविस्तर!

शनिवारी दुपारी संसदीय कामकाज मंत्रालयाने शनिवारी शिष्टमंडळाचे नेतृत्व करणाऱ्या खासदारांची नावे जाहीर केली. यामध्ये काँग्रेसचे एकमेव खासदार शशी थरूर यांचे नाव समाविष्ट आहे. दरम्यान, काँग्रेसने शशी थरूर यांच्या नावावरच आक्षेप घेतला आहे. कॉंग्रेस कडून सांगण्यात आले की, शशी थरूर यांचे नाव केंद्राला दिलेले नव्हते तरी देखील त्यांचे नाव कसे आले?, असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला.

Take a Poll

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, 'शुक्रवारी (16 मे) सकाळी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. त्यांनी परदेशात पाठवल्या जाणाऱ्या शिष्टमंडळासाठी 4 खासदारांची नावे मागितली होती. काँग्रेसने आनंद शर्मा, गौरव गोगोई, डॉ. सय्यद नसीर हुसेन आणि राजा ब्रार यांची नावे दिली होती.

थरूर म्हणाले- मला सन्मानजनक वाटत आहे

दुसरीकडे, शशी थरूर यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी दिल्याबद्दल केंद्राचे आभार मानले. त्यांनी X वर लिहिले, 'अलीकडील घडामोडींवर आपल्या देशाचा दृष्टिकोन मांडण्यासाठी पाच प्रमुख देशांच्या राजधान्यांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी भारत सरकारच्या आमंत्रणाचा मला सन्मान वाटतो.

जेव्हा राष्ट्रीय हिताचा प्रश्न येतो आणि माझ्या सेवांची आवश्यकता असते तेव्हा मी मागे राहणार नाही. यापूर्वी शशी थरूर यांनी 8 मे रोजी केंद्र सरकारचे कौतुक केले होते. त्यांनी म्हटले होते की ऑपरेशन सिंदूर हा पाकिस्तान आणि जगासाठी एक मजबूत संदेश आहे. 26 निष्पाप नागरिकांच्या मृत्युचा बदला घेण्यासाठी भारताने अचूक कारवाई केली आहे, असेही त्यांनी म्हटले.

जयराम रमेश यांचा थरूर यांच्यावर निशाणा

शिष्टमंडळातील एका गटाचे नेतृत्व काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. या मुद्द्यावरून राजकारण शिगेला पोहोचले आहे. काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी आज (शनिवार, 17 मे 2025) पत्रकार परिषदेत शशी थरूर यांच्यावर हल्लाबोल केला आणि म्हटले की, काँग्रेसमध्ये असणे आणि काँग्रेसचे असणे यात खूप फरक आहे. मात्र, त्यांनी शशी थरूर यांचे नाव घेतले नाही.

जयराम रमेश म्हणाले की, मी व्यक्तींवर भाष्य करणार नाही पण काँग्रेसचे असणे आणि काँग्रेसमध्ये असणे यात खूप फरक आहे. सरकारने चार नावे मागितली होती आणि आम्ही ती दिली. पण सरकारचे प्रेस रिलीज करून धक्काच दिला.

सरकारचे वर्तन प्रामाणिकपणा दर्शवत नाही. सरकार एका गंभीर प्रकरणात खेळ खेळत आहे. सरकारची राजनयिकता अपयशी ठरली आहे. हे संधीसाधूपणाचे राजकारण आहे. सरकारने या मुद्द्यारुन संसदेच अधिवेशन बोलावले पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली.

हे ही वाचा : खासदार देणार operation sindoorची जगाला माहिती, पाकिस्तानला उघडं पाडणार,वाचा- खासदारांची संपूर्ण यादी

काँग्रेसने म्हटले होते- थरूर यांनी लक्ष्मण रेखा ओलांडली

ऑपरेशन सिंदूरवर केंद्र सरकारची स्तुती केल्याबद्दल अनेक काँग्रेस नेते शशी थरूर यांच्यावर नाराज आहेत. काँग्रेस कार्यकारिणी समितीची (CWC) बैठक 14 मे रोजी दिल्लीत झाली. यामध्ये काही नेत्यांनी थरूर यांच्याकडे बोट दाखवत म्हटले होते की, ही वैयक्तिक मते व्यक्त करण्याची वेळ नाही, तर पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट करण्याची वेळ आहे. काँग्रेस हा लोकशाही पक्ष आहे, पण लोक त्यांचे मत व्यक्त करत राहतात. यावेळी थरूर यांनी लक्ष्मण रेखा ओलांडली आहे, असा निशाणा देखील साधला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+