खासदार देणार operation sindoorची जगाला माहिती, पाकिस्तानला उघडं पाडणार,वाचा- खासदारांची संपूर्ण यादी
operation sindoor : भारताने दहशतवादाविरुद्धचे आपले धोरण केवळ सीमेपुरते मर्यादित ठेवलेले नाही. 7 मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी छावण्यांवर केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' या सर्जिकल एअर स्ट्राईकनंतर, केंद्र सरकारने आता एक मोठे राजनैतिक पाऊल उचलले आहे.
भारताचे दहशतवादविरोधी धोरण आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आणि देशांसमोर मांडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जेणेकरून जगाला हे सांगता येईल की भारत केवळ हल्ल्यांना प्रतिसाद देत नाही. तर दहशतवादी संघटना आणि त्यांना आश्रय देणाऱ्या देशांविरुद्ध ठोस कारवाई देखील करतो.

या उद्देशाने, केंद्र सरकार आता सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या निवडक खासदारांना परदेश दौऱ्यावर पाठवत आहे. हे खासदार अमेरिका, ब्रिटन, यूएई, कतार आणि दक्षिण आफ्रिका यासारख्या महत्त्वाच्या देशांना भेट देतील. तेथील सरकारे, राजदूत आणि धोरणकर्त्यांशी बोलून दहशतवादाबाबत भारताची भूमिका जोरदारपणे मांडू.
सरकारचा असा विश्वास आहे की जेव्हा वेगवेगळ्या विचारसरणीचे नेते एकत्र येतात आणि दहशतवादाविरुद्ध एका आवाजात बोलतात, तेव्हा जगात भारताची विश्वासार्हता अधिक मजबूत होईल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदारांचा हा परदेश दौरा 22 किंवा 23 मे पासून सुरू होऊ शकतो आणि सुमारे 10 दिवस चालेल. परराष्ट्र मंत्रालयाने खासदारांना आवश्यक कागदपत्रे आणि पासपोर्ट तयार ठेवण्यास सांगितले आहे. मंत्रालय लवकरच या भेटीबद्दल अधिक माहिती शेअर करेल.
अनेक पक्षांच्या खासदारांचा समावेश, 7 गट तयार केले जातील
या शिष्टमंडळात भाजप, काँग्रेस, जेडीयू, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे खासदार असतील. 7 खासदारांचे 7 गट तयार केले जातील असे सांगितले जात आहे. प्रत्येक गटासोबत परराष्ट्र मंत्रालयाचा एक अधिकारी आणि एक सरकारी प्रतिनिधी देखील उपस्थित असेल.
शिष्टमंडळात प्रसिद्ध चेहरे असतील
शिष्टमंडळाचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे शशी थरूर, भाजपचे रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा, जेडीयूचे संजय कुमार झा, द्रमुकच्या कनिमोळी, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांचा समावेश आहे.
ऑपरेशन सिंदूर आणि सीमापार दहशतवादाविरुद्ध भारताच्या सततच्या लढाईच्या संदर्भात, सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे या महिन्याच्या अखेरीस संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांसह प्रमुख भागीदार देशांना भेट देणार आहेत. खालील संसद सदस्य सात शिष्टमंडळांचे नेतृत्व करतील:
- शशी थरूर, काँग्रेस
- रविशंकर प्रसाद, भाजप
- संजय कुमार झा, जेडीयू
- बैजयंत पांडा, भाजप
- कनिमोझी करुणानिधी, द्रमुक
- सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस
- श्रीकांत एकनाथ शिंदे, शिवसेना
ओवैसींना नाही मिळाली जागा!
पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरबाबत असदुद्दीन ओवैसी यांनी ज्या पद्धतीने आपले विचार व्यक्त केले आणि आवाज उठवला ते पाहून एआयएमआयएम प्रमुखांना प्रतिनिधींच्या टीममध्ये समाविष्ट केले जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु, तसे झाले नाही. नेतृत्व करणाऱ्या 7 प्रतिनिधींमध्ये ओवेसींचे नाव समाविष्ट नाही. यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही.












Click it and Unblock the Notifications